जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / गाडी चालवताना Bluetooth Earphone वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

गाडी चालवताना Bluetooth Earphone वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

गाडी चालवताना Bluetooth Earphone वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

तुम्हालाही सवय आहे का गाडी चालवताना गुपचूप ब्लूटूथ हेडफोन किंवा इयरपॉड कानाला लावायची? मग हे वाचाच

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, १० सप्टेंबर:  वाहतुकीच्या नियमांचं पालन होत नसल्याने अपघात होतात आणि त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी व अवजड वाहनांसह शहर किंवा परिसरात दुचाकी अपघातात (Two Wheeler Accident) मृत्युमुखी पडणारे व जायबंदी होणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी वेळोवेळी प्रयत्न केले जातात. आवश्यकतेनुसार नियमांमध्ये सुधारणाही केल्या जातात. दुचाकी चालवताना चालकाने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, तर त्याचा स्वत:चा जीव धोक्यात येतोच; पण इतरांनाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आजही अनेकांना वाहतुकीचे सगळे नियम माहिती नसतात. ते माहिती करून घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतात. वाहन चालवताना मोबाइल वापरणं तर नियमबाह्य आहेच; पण ब्लूटूथ किंवा इअरफोन वापरणंही नियमबाह्य आहे. कुठलंही वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणं नियमबाह्य आहे. वाहतुकीच्या नियमावलीत (Traffic Rules) याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. परंतु बहुतांश राज्यांतल्या मोटार वाहन कायद्यात (Motor Vehicle Act) ब्लूटूथ हेडफोन्स किंवा इयरफोन्सबद्दल (Bluetooth Headphones) स्पष्ट माहिती दिली गेलेली नाही. वेगवेगळ्या राज्यात भिन्न नियमावली आहे; मात्र बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांच्या वेबसाइटवर या संदर्भातला नियम स्पष्टपणे दिला गेला आहे. (Bangalore Traffic Police) वाहन चालवताना मोबाइल फोन, इयरफोन्स आणि ब्लूटूथ हेडसेट वापरले, तर दंड केला जाईल, असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या नियमात केलेला आहे. बेंगळुरू वाहतूक पोलिसांच्या वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे, फक्त मोबाइल फोनच नाही तर वाहन चालवताना (Driving) हँड्स फ्री उपकरणं, म्हणजेच इयरफोन, ब्लूटूथ हेडसेट आदींचा वापर करणं गुन्हा आहे. वाहन चालवत एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दिशा जाणून घ्यायची असेल (Navigation) म्हणजेच जीपीएसचा वापर करण्यासाठी तरच ड्रायव्हिंग करताना मोबाइलचा वापर करण्याची परवानगी आहे. मोटार वाहन कायद्यातल्या कलम 184 (सी) नुसार, कुठलीही व्यक्ती वाहन चालवताना हातात मोबाइल फोन आणि हँड्सफ्री उपकरणांचा वापर करू शकत नाही. नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळल्यास दुचाकी किंवा तिचाकी वाहनांसाठी (Two/Three Wheeler) 1,500 रुपये दंड, एलएमव्ही म्हणजेच कार्ससाठी (LMV-Light Motor Vehicle) 1,500 रुपये व इतर वाहनांसाठी 5,000 रुपयांचा दंड भरावा लागतो. दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर केलेल्या गुन्ह्यांसाठी 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. इयरफोन, ब्लूटूथ हेडसेट्स लावून अनेक दुचाकीचालक फोनवर बोलत वाहन चालवतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांच्या हॉर्नचा आवाज येत नाही. लक्षही विचलित होतं. परिणामी अपघातात जीव गमवावा लागू शकतो. असे काही अपघात घडलेही आहेत. वाहन चालवताना चालकाचं लक्ष बोलण्याकडे किंवा मोबाइलवर लावलेल्या गाण्यांकडे असतं. या गोष्टी टाळण्यासाठी वाहन चालवताना मोबाइल, इयरफोन, ब्लूटूथचा वापर करू नये, असं आवाहन केलं जातं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात