कोईंबतूर, 6 फेब्रुवारी : एखाद्या भुकेल्याला (hungry) घास खाऊ घालणं हे भारतीय संस्कृतीत अतिशय पुण्यांचं काम समजलं जातं. असंच काम एक महिला अतिशय निस्वार्थपणे करते आहे. ही महिला कोईम्बतूरमध्ये (Coimbatore) राहते. ही भुकेल्या गरीबांना (poor) हातानं बनवलेली बिर्याणी (Biryani) खाऊ घालते. यासाठी त्यांच्याकडून ती एक पैसा घेत नाही. या महिलेचं सध्या असंख्य लोक कौतुक करत आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर शहरात राहणारी ही महिला (woman) आपल्या घराबाहेर बिर्याणीचा स्टॉल (stall) लावते. ही महिला केवळ 20 रुपयात एक प्लेट बिर्याणी विकते. हा दर (rate) सगळ्यांसाठी इतकाच आहे. मात्र त्यांच्या स्टॉलवर कुणी भुकेला माणूस आला आणि त्याच्याकडं पैसे नसले, तरी त्याला ती प्रेमानं आधी बिर्याणी देते. आणि त्याच्याकडून एक रुपयाही घेत नाही. हवी तेवढी बिर्याणी पुन्हा-पुन्हा ती अशा भुकेल्या माणसाला देते. हे ही वाचा- YouTubeवर चॅलेंज घेऊन प्यायला दीड लीटर वोडका;Livestream मध्ये घडला मृत्यूचा थरार ती सांगते, की माझा हेतू केवळ भुकेल्यांना जेवण देणं इतकाच आहे. मी एरवी बिर्याणी वीस रुपयांना एक प्लेट अशी विकते. मात्र ज्यांच्याकडे पैसा नाही आणि खरोखर जे भुकेले आहेत ते माझ्याकडे आले तर नक्कीच विनामूल्य जेऊन जातील. या महिलेनं आधुनिक काळात माणुसकी काय असते हे दाखवून दिलं आहे. सध्या शहरात या महिलेची खूप चर्चा आहे. अनेक लोक कुतूहलापोटी या महिलेच्या स्टॉलला भेट देत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.