• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • अभ्यासाच्या धड्यांसोबत गिरवले प्रेमाचे धडे; विद्यार्थिनी-शिक्षक गाव सोडून पळाले

अभ्यासाच्या धड्यांसोबत गिरवले प्रेमाचे धडे; विद्यार्थिनी-शिक्षक गाव सोडून पळाले

आपल्या विद्यार्थिनीला अभ्यासाचे धडे देता देता एक शिक्षक तिच्याच आकंठ प्रेमात बुडाले. मात्र दोघांच्याही घरच्यांचा प्रेमाला असणारा विरोध पाहून त्यांनी गाव सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

 • Share this:
  जयपूर, 29 जून: या जगात कुणाचं, कुणावर आणि कधी प्रेम जडेल हे काही सांगता नाही येत. आपल्या विद्यार्थिनीला (Student) अभ्यासाचे धडे देता देता एक शिक्षक (Teacher) तिच्याच आकंठ प्रेमात (Love affair) बुडाले. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिला इंग्रजीचे धडे देणारे शिक्षक यांचं बघता बघता एकमेकांवर प्रेम जडलं. या गोष्टीची त्यांनी आपापल्या घरच्यांना कल्पना दिली. मात्र दोघांच्याही घरून याला विरोध झाला. त्यानंतर या दोघांनीही गाव सोडून (Ran away) पळून जाण्याचा निर्णय घेतला. ही अनोखी लव्ह स्टोरी आहे राजस्थानमधील (Rajasthan) बडू नावाच्या छोट्याशा गावातील. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचे शिक्षक यांचं गेल्या दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. या काळात त्यांच्या कुटुंबीयांनादेखील याची कल्पना आली होती. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांची समजूत घालत त्यांना एकमेकांपासून वेगळं होण्याचा सल्ला अनेकदा दिला होता. मात्र सल्ला ऐकेल, ते प्रेम कसलं! अशी आखली पलायनाची योजना घरचे आपल्या प्रेमाला दाद देत नाहीत, हे समजल्यावर अधिक वेळ न दवडता पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. ही घटना घडण्यापूर्वी एका रविवारी या शिक्षकाने गावातील झेरॉक्स सेंटरमधून आधार कार्ड आणि इतर काही कागदपत्रांच्या झेरॉक्स काढल्या. त्यानं एका बनावट सिम कार्डसाठीही दुकानदाराला विनंती केली होती. मात्र दुकानदारानं ते द्यायला नकार दिला. अशी सगळी तयारी करून त्यांनी एका जागी भेटण्याचा निर्णय घेतला आणि तिथून गाव सोडून ते पळून गेले. ते नेमके कुठं गेले, याचा कुठलीही माहिती कुटुंबीयांना नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हे वाचा - वाढदिवसाच्या केकनं वाचवला जीव; बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले दोघं भाऊ शिक्षक-विद्यार्थिनी लांबचे नातेवाईक पळून गेलेले शिक्षक आणि त्यांची विद्यार्थिनी हे लांबचे नातेवाईक असून त्यांची जात, गोत्र वगैरे एकच असल्याचं शिक्षकाच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थिनीचं नातं अशा प्रकारांमुळे बदनाम होत असल्याची टीका काही ग्रामस्थ करत आहेत. तर दोघांचं एकमेकांवर प्रेम असताना आणि जातीचीही अडचण नसताना दोघांचेही कुटुंबीय त्यांच्या विवाहाला का विरोध करत होते, अशी चर्चादेखील आता गावात रंगली आहे.
  Published by:desk news
  First published: