जाहिरात
मराठी बातम्या / देश / अरे बापरे! 73 वर्षीय आजोबांना पाच वेळा कोरोना लस, सहाव्या लसीचीही मिळाली तारीख

अरे बापरे! 73 वर्षीय आजोबांना पाच वेळा कोरोना लस, सहाव्या लसीचीही मिळाली तारीख

अरे बापरे! 73 वर्षीय आजोबांना पाच वेळा कोरोना लस, सहाव्या लसीचीही मिळाली तारीख

एका 73 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला आतापर्यंत 5 वेळा लसी दिल्या (A senior citizen vaccinated 5 times) असून सहाव्या लसीची कागदोपत्री (Date of sixth vaccine) तारीखही मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेरठ, 19 सप्टेंबर : एका 73 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला आतापर्यंत 5 वेळा लसी दिल्या (A senior citizen vaccinated 5 times) असून सहाव्या लसीची कागदोपत्री (Date of sixth vaccine) तारीखही मिळाली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतील अनेक घोळ (Technical errors) समोर येत असून नागरिकांना लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळण्यात येणाऱ्या अडचणी अधोरेखित होत आहेत. काय आहे प्रकार? उत्तर प्रदेशातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या लसीकरणाच्या रेकॉर्डने सर्वांनाच हैराण केलं आहे. मेरठमधील चौधरी रामपाल सिंह यांना कोरोनाची पहिली लस 16 मार्च रोजी आणि दुसरी लस 8 मे 2021 रोजी देण्यात आली होती. या लसीकरणाचं सर्टिफिकेटही त्यांना देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर याच लसीकरणाचं ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ते मिळालं नाही. ऑनलाईन सर्टिफिकेट ऑनलाईन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी चौधरी रामपाल सिंह यांनी सरकारी कार्यालयांचे खेटे घातले. त्यानंतर सरकारी वेबसाईटवर त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या नावे एकूण 3 सर्टिफिकेट असल्याचं त्यांना आढळलं. एका सर्टिफिकेटमध्ये त्यांना लसीचे दोन डोस देण्यात आले होते. दुसऱ्या सर्टिफिकेटमध्ये एक डोस देण्यात आला होता. तर तिसऱ्या सर्टिफिकेटमध्ये त्यांचा एक डोस झाला असून दुसऱ्या डोसची तारीख देण्यात आली होती. हा प्रकार पाहून चौधरी रामपाल सिंह यांना धक्काच बसला. त्यांच्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनादेखील आश्चर्य वाटलं. हे वाचा - अफगाणिस्तानात अन्नाची टंचाई, पोटासाठी 1 लाखाची वस्तू विकली जातेय 25 हजारात अधिकारी करणार चौकशी असा प्रकार का घडला, याची चौकशी करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. काही तांत्रिक चुकांमुळे असे प्रकार घडू शकतात, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. वास्तविक, चौधरी रामपाल सिंह यांना लसीचे दोनच डोस देण्यात आले आहेत, मात्र कागदोपत्री त्यांचे पाच डोस झाल्याचं दिसल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात