Home /News /national /

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; घर बांधण्यासाठी साठवलेले 5 लाख रुपये वाळवीने कुरतडले

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; घर बांधण्यासाठी साठवलेले 5 लाख रुपये वाळवीने कुरतडले

एका व्यक्तीची आयुष्यभराच्या कमाईला वाळवी (Termites) लागली आहे. त्याने लोखंडी पेटीत ठेवलेल्या सर्व नोटा वाळवीने कुरतडल्या (Termites eats all saved money) आहेत. हे दृश्य पाहून त्याच्या कुटुंबीयातील सदस्यांना अश्रू अनावर झाले.

    कृष्णा, 23 फेब्रुवारी: सध्या भारतात डिजिटल इंडियाच्या घोषणा दिल्या जात असल्या तरी भारतात एक असा समुदाय आहे. ज्याला बँकिंग क्षेत्राचा मागमूसही नाही. तो अजूनही आपल्या तुटपुंज्या कमाईतील थोडाफार पैसा आपल्या घरातच साठवून ठेवतो. ज्यामुळे आयुष्यात अचानक येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करता येईल, हा त्यामागचा उद्देश. पण काही वेळा असं काही विपरित घडतं, ज्यामुळे सर्व स्वप्नांचा चुराडा होतो. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने गेल्या काही वर्षांपासून पै पै गोळा केली होती. आणि हा सर्व पैसा घरातीलच एका लोखंडी पेटीत प्लॅस्टीकच्या बॅगमध्ये गुंडाळून ठेवली होती. पण गेल्या काही काळापासून त्याने या पैशाकडे लक्ष दिलं नव्हतं. पण गेल्या आठवड्यात एका व्यक्तीची उधारी देण्यासाठी जेव्हा ही पेटी उघडली, तेव्हा आतील दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोकाचं चुकला आहे. कारण त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची आयुष्यभराची कमाईला वाळवी (Termites) लागली होती. पेटीत ठेवलेल्या सर्व नोटा वाळवीने कुरतडल्या (Termites eats all saved money) होत्या. हे दृश्य पाहून कुटुंबियातील सदस्याना अश्रू अनावर झाले. गेल्या काही वर्षांपासून नवीन घराचं पाहिलेलं स्वप्न एका क्षणात धुळीस मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मइलावरममध्ये राहणाऱ्या जमालया नावाच्या व्यक्तीची आहे. तो एका मटन शॉपमध्ये मांस विक्रीचं काम करतो. त्याने गेल्या काही वर्षांपासून पै पै जोडायला सुरुवात केली होती. त्याला या पैशातून स्वत: साठी आणि कुटुंबियासाठी घर बांधायचं होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याने हे पैशे उघडून पाहिलेचं नाहीत. हे ही वाचा -मोठा निर्णय: अठरा महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 2020 साली या भागात बराच पाऊस झाला होता. अशा मोसमात वाळवी लागण्याची शक्यता जास्त असते. जमालयाच्या बाबतीतही हेच घडलं आहे. त्याच्या घरी ठेवलेल्या लोंखडी पेटीत ठेवलेल्या पैशांना वाळवी लागली आहे. वाळवीने सर्व नोटा खराब केल्या आहेत. जमालयची आर्थिक परिस्थिती खूपच हलाकीची आहे. गेल्या आठवड्यात त्याने एका व्यक्तीची उधारी देण्यासाठी ही पेटी उघडली तेव्हा त्याच्या स्वप्नाचा भंग झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. हे ही वाचा - लग्नाच्या मंडपातून उठून जोडप्यानं वाचवला चिमुकलीचा जीव, पोलिसांनीही केलं कौतुक त्याने पेटी उघडताच त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा काळजाचा ठोकाच चुकला आहे झाला. वाळवीने सर्व नोटा खाल्या होत्या. या पेटीत एकूण पाच लाख एवढी रक्कम होती, ज्यामध्ये 500, 200, 100, 20 आणि अगदी 10 रुपयांच्या नोटांचा देखील समावेश होता. यानंतर जमालयाची अवस्था पाहून बँक ऑफ बडोदाचे अधिकारी मदतीसाठे पुढे सरसावले आहेत. त्यांनी या पैशांचा पंचनामा करून हे सर्व रुपये रिझर्व्ह बँकेला पाठवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतरच जमालयाला मदत मिळते की नाही ते सांगता येईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Andhra pradesh

    पुढील बातम्या