Rape and Murder Case: अठरा महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rape and Murder Case: अठरा महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

18 महिन्यांच्या चिमुकलीला गावातीलच एका व्यक्तीनं तिच्या घरुन उचलून नेलं होतं. यानंतर त्यानं मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या (Rape and Murder Case) केली होती.

  • Share this:

हरदोई 23 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात जवळपास 7 वर्षांपूर्वी 18 महिन्यांच्या चिमुकलीवर एका व्यक्तीनं बलात्कार (Rape and Murder Case) केला होता. या प्रकरणातील आरोपीला आता जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा (Death Sentence) सुनावली आहे. यासोबतच दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या निर्णयाला ऐतिहासिक सांगत सरकारी वकील म्हणाले, की यामुळे समाजात एक कठोर संदेश जाईल आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्यास मदत होईल.

2014 साली देहात कोतवाली ठाण्याच्या क्षेत्रात एका गावात 18 महिन्यांच्या चिमुकलीला गावातीलच एका व्यक्तीनं तिच्या घरुन उचलून नेलं होतं. यानंतर त्यानं मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. घटना उघड होऊ नये यासाठी आरोपीनं मुलीचा मृतदेह तलावात फेकून दिला होता. याप्रकरणी भरपूर तपास आणि शोधाशोध केल्यानंतर गावातील लोकांना तिचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं.

निर्णयाचं होतंय कौतुक -

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु होती. अशात सोमवारी अखेर हरदोईच्या अप्पर सत्र आणि जिल्हा न्यायालयाच्या कोर्ट नंबर 14 मधून ऐतिहासिक निर्णय सुनावण्यात आला. याप्रकरणी संबंधित व्यक्ती आरोपी असल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा आणि दोन लाखाचा दंड ठोठावण्यात आला. न्यायालयाच्या या निर्णयाचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे.

समजात योग्य संदेश -

सरकारी वकील रामचंद्र राजपूत यांनी सांगितलं, की न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे समाजात योग्य आणि कठोर असा संदेश जाणार आहे. यामुळे अशा कृत्याचा विचार करतानाही एखादा व्यक्ती शंभर वेळा विचार करेल आणि त्याच्या मनात एक भिती निर्माण होईल.

Published by: Kiran Pharate
First published: February 23, 2021, 10:00 AM IST

ताज्या बातम्या