वाराणसी 23 फेब्रुवारी : असं अनेकदा होतं की लोकं रक्तदान करुन इतरांचा जीव वाचवतात. मात्र, आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवशीही वेळ काढून एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान (Blood Donation) करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. असंच घडलं उत्तर प्रदेशात. इथे एका जोडप्यानं आपल्याच लग्नाच्या (Marriage) दिवशी वेळ काढत कौतुकास्पद काम केलं.त्यांनी आपल्या लग्नाच्या दिवशीच एका चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान केलं. उत्तर प्रदेश पोलिसातील (Uttar Pradesh Police) हवालदार आशीष मिश्रा यांनी ट्वीटरवरुन या गोष्टीची माहिती दिली.
मिश्रा यांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या जोडप्याचं कौतुक केलं. त्यांनी या जोडप्याचा रक्तदान करतानाचा लग्नाच्या कपड्यांमधील फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये नवरदेव रक्तदान करताना दिसत आहे. तर, नवरी नवरदेवाशेजारी आपल्या लग्नाच्या पोशाखात उभी आहे.
आशिष मिश्रा यांनी ट्वीटरवर फोटो शेअर करत लिहिलं, की एका लहान मुलीला रक्ताची गरज होती. कोणीही रक्तदान करण्यासाठी समोर येत नव्हतं. कारण, ती कोणा दुसऱ्याची मुलगी होती. आपली असती तर कदाचित ते समोर आलेही असते. असो, मात्र लग्नाच्या दिवशी या जोडप्यानं रक्तदान करुन एका चिमुकलीचा जीव वाचवला आहे.
मेरा भारत महान | एक बच्ची को ब्लड की जरूरत थी,कोई भी रक्तदान करने को सामने नही आ रहा था, क्योंकि वो किसी दूसरे की बच्ची थी,अपनी होती तो शायद कर भी देते, खैर, शादी के दिन ही इस जोड़े ने रक्तदान कर बच्ची की जान बचायी | Jai Hind,#PoliceMitra #UpPoliceMitra #BloodDonation pic.twitter.com/tXctaRe1nR
— Ashish Kr Mishra (@IndianCopAshish) February 22, 2021
आशिष मिश्रांच्या पुढाकारानं पोलीस मित्रच्या माध्यमातून रक्तदात्यांचा गरजू लोकांसोबत संपर्क करून दिला जातो. कारण, एखाद्या जीव वाचवला जावा. नवविवाहित जोडप्याच्या या कामाचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणाक कौतुक होत आहे. लोक केवळ त्यांचं कौतुक करत नाही. तर त्यांच्या या कार्याला सलामही करत आहेत. एका यूजरनं सलाम करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. तर एकानं लिहिलं ग्रेट वर्क. आशिष मिश्रा यांनी 2017 मध्ये रक्तदात्यांसोबत जोडलं जात रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पोलीस मित्र अभियान सुरू केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Blood donation