मराठी बातम्या /बातम्या /देश /पोस्टमार्टेमसाठी टेबलावर घेतलेल्या 'मृतदेहा'ला हात लावताच उठले शहारे; हातही हलल्यावर डॉक्टरच पडले गार

पोस्टमार्टेमसाठी टेबलावर घेतलेल्या 'मृतदेहा'ला हात लावताच उठले शहारे; हातही हलल्यावर डॉक्टरच पडले गार

(Karnataka brain dead man alive: देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. या म्हणीचा प्रत्यय कर्नाटकातील एका घटनेत आला आहे.

(Karnataka brain dead man alive: देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. या म्हणीचा प्रत्यय कर्नाटकातील एका घटनेत आला आहे.

(Karnataka brain dead man alive: देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. या म्हणीचा प्रत्यय कर्नाटकातील एका घटनेत आला आहे.

बंगळूरू, 2 मार्च : एका 27 वर्षांच्या पुरुषाला कर्नाटकमध्ये अपघातात ब्रेन डेड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र  त्याच्याच दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याचे  महत्त्वाचे अवयव सुरळीत काम करत असून उपचारास प्रतिसाद देत असल्याचं समोर आलं.

(Karnataka brain dead man alive)

त्या माणसाचा देह दूसऱ्या हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला गेला. त्यावेळी शवविच्छेदनासाठी नेमलेल्या डॉक्टरनं त्याच्या देहाला स्पर्श केला आणि एकाएकी त्यांना हाताची हालचाल जाणवली. या डॉक्टरांच्या अंगांवर हे पाहून अक्षरश: शहारे आले. (brain dead man found alive)

शंकर गोम्बी यांचा 27 फेब्रुवारीला महालिंगपूर इथं अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं.  दोन दिवसांनी हॉस्पिटलनं गोम्बी यांच्या कुटुंबाला त्यांचा देह घेऊन जाण्यास सांगितलं. गोम्बी यांचा कथित मृतदेह महालिंगपूर इथल्या सरकारी दवाखान्यात सोमवारी पाठवण्यात आला. इथं या देहाचं शवविच्छेदन केलं जाणार होतं. त्याच दिवशी गोम्बी यांच्यावर अंत्यसंकट करण्याची तयारीही त्यांचं कुटुंब करत होतं. (brain dead man alive at postmortem)

हेही वाचा कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार, प्रेमविवाहात घटस्फोट देण्यासाठी मुलीवर जातपंचाय

एस. एस. गलगली या डॉक्टरांकडे शवविच्छेदनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गलगली म्हणाले, 'मी गाडीनं हॉस्पिटलला जात असताना मला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गोम्बी यांना श्रद्धांजली वाहणारे फलक दिसले. सर्जरी टेबलवर मला दिसणार होता तो चेहरा त्यातून माझ्या ओळखीचा झाला. मात्र गोम्बी जिवंत असेल ही कल्पना मी अजिबातच केली नव्हती.' गलगली यांना हॉस्पिटलमध्ये कळालं, की गोम्बी अजून व्हेंटिलेटर अर्थात कृत्रिम श्वसनयंत्रणेवर आहेत. गोम्बीच्या कुटुंबानं गलगली यांना सांगितलं, की व्हेंटिलेटर काढल्यावर श्वास थांबतील असं खासगी हॉस्पिटलनं त्यांना कळवलं होतं. (doctor found dead man alive)

'या कुटुंबाला कळवण्यात आलं होतं, की व्हेंटिलेटर काढल्यावर तो अधिकृतपणे मृत झालेला असेल. त्यामुळं त्यांनीही अंतिमसंस्काराची तयारी सुरू केली होती. गोम्बीच्या मित्रांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली होती. त्यामुळं मी हॉस्पिटलला पोचेपर्यंत तिथं जवळपास 1000 लोक जमलेले होते. मी आत जाऊन शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी देहाला स्पर्श केला तोच मला दिसलं, की गोम्बीच्या अंगावर शहारे आले आहेत... याचाच अर्थ शरीरात संवेदना अजून जिवंत होत्या. मी लगेचच प्लस ऑक्सिमीटर वापरत नाडी तपासली, हृदयाचे ठोकेही तपासले. नाडी लागत होती. मग मी व्हेंटिलेटर काढून टाकलं आणि जरावेळ वाट पाहिली. आणि काय आश्चर्य, त्याच्या हाताची हालचाल झाली! मी लगेचच कुटुंबाला बोलावलं आणि त्याला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.' (Karnataka brain dead man alive story)

हेही वाचा लायसन्स नसताना गाडी चालवताना मुलाचा मृत्यू; आईवर गुन्हा दाखल

गलगली म्हणाले, की मंगळवारी त्यांना गोम्बीचे महत्त्वाचे अवयव काम करत असून त्याच्यात सुधारणा दिसत असल्याचं सांगण्यात आलं. 'मला सांगण्यात आलं, की तो वाचण्याची शक्यता आहे कारण त्याच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळतो आहे. मी आजवरच्या 18 वर्षांच्या सेवेत 400 पोस्टमार्टम्स केले आहेत पण अशी केस पहिल्यांदाच पाहिली.'

बगलकोटाच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं, की आमच्याकडे अद्याप तक्रार आलेली नसल्यानं कुठलीच केस नोंदवण्यात आलेली नाही. 'वैद्यकीय बेजबादारापणाची केस नोंदवण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागेल.' गोम्बी जिथं उपचार घेत होते त्या खासगी हॉस्पिटलचे अधिकारी बाजू सांगण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. हॉस्पिटलची बाजू कळाल्यावर बातमीत ती नोंदवली जाईल.

First published:

Tags: Accident, Karnataka, Postmortem