जाहिरात
मराठी बातम्या / देश / Heatwave in India: उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा हाहाकार; यूपी-बिहारमध्ये 3 दिवसात 98 जणांचा मृत्यू

Heatwave in India: उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा हाहाकार; यूपी-बिहारमध्ये 3 दिवसात 98 जणांचा मृत्यू

उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा कहर

उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा कहर

जून महिना संपत आला तरी उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्णतेमुळे किमान 98 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 20 जून : जून महिना संपत आला तरी उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्णतेमुळे किमान 98 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात 54 जणांचा मृत्यू झाला आहे, तर बिहारमध्ये अति उष्ण हवामानामुळे 44 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या किमान 54 लोकांचा 15, 16 आणि 17 जून दरम्यान तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ताप, श्वास घेण्यास त्रास आणि इतर आरोग्यविषयक समस्यांसह गेल्या तीन दिवसांत बलिया येथील जिल्हा रुग्णालयात किमान 400 लोकांना दाखल करण्यात आले आहे. बहुतेक रुग्ण 60 पेक्षा जास्त वयाचे आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ जयंत कुमार म्हणाले की, जिल्हा तीव्र उष्णतेने त्रस्त आहे आणि लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जात आहे. बलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जयंत कुमार यांनी शनिवारी असोसिएटेड प्रेसला सांगितलं की, “मृतांमधील जवळपास सर्व व्यक्ती काहीतरी आजारांनी ग्रासले होते आणि तीव्र उष्णतेमुळे त्यांची प्रकृती बिघडली. ते म्हणाले, की बहुतेक मृत्यू हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि अतिसारामुळे झाले आहेत. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 15 जून रोजी 23, 20 जून 16 आणि 17 जून रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत 11 मृत्यूची नोंद झाली होती. ज्यामुळे सरकारने मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्यासाठी राजधानी लखनऊ येथून डॉक्टरांचे पथक बोलावले होते. Weather Update: पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, तर कुठे उष्णतेची लाट, पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक (सीएमएस) दिवाकर सिंह यांनी पत्रकारांना सांगितलं की, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी रुग्णालयात पंखे, कुलर आणि एअर कंडिशनरची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या गर्दीमुळे डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) डाटानुसार, बलियामध्ये शुक्रवारी कमाल तापमान 42.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सामान्यपेक्षा 4.7 अंश जास्त आहे. बिहारमध्येही परिस्थिती वेगळी नाही. कारण उष्णतेच्या लाटेमुळे 24 तासांत 44 जणांचा मृत्यू झाला. राज्यात किमान 18 ठिकाणी उष्णतेची भीषण लाट तर चार ठिकाणी उष्णतेची लाट आली. पाटण्यात 24 जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या असून राज्यातील इतर जिल्ह्यांनीही शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात