उपेंद्र कुमार द्विवेदी/ 19 मे वाराणसी : सकाळी कचोरी, दुपारी थंडाई आणि संध्याकाळी लिट्टी चोखा असे चमचमीत पदार्थ खाणाऱ्या वाराणसीतील लोकांची रोगप्रतिकारक क्षमता पाहून प्रशासनही हैराण झालं आहे. वाराणसीत (varansi) कोरोना रुग्ण कोरोनाव्हायरसवर मात करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे एकिकडे कोरोना रुग्णांवर वेगवेगेळी औषधं वापरून उपचार केले जात आहेत. तर दुसरीकडे वाराणसीत मात्र फक्त सामान्य औषधांनीच कोरोना रुग्ण बरे होताना दिसत आहेत. आतापर्यंत वाराणसीत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हायड्रोक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) औषधाशिवायच बरे झालेत. इथल्या बहुतेक रुग्णांना साधारण पॅरामसिटामॉल (Paracetamol) आणि अँटिबायोटिक्स (Antibiotics) देण्यात आलेत आणि ते नेगेटिव्ह झालेत. पंडित दीनदयाल उपाध्याय रुग्णालयातील आकडेवारी चकीत करणारी आहे. वाराणसीचे डीएम कौशल राज शर्माही वाराणसीतल्या नागरिकांची रोगप्रतिराक शक्ती पाहून हैराण झालेत. हे वाचा - लसीशिवायच होणार Coronavirus चा नाश; WHO च्या माजी संचालकांचा दावा न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, वाराणसीमध्ये 80 टक्के कोरोना रुग्ण हायड्रोक्लोरोक्विन औषध न घेताच बरे झालेत. हे औषध मलेरियाच्या रुग्णांना दिलं जातं. आर्थयराइटसवर उपचारासाठीही वापरलं जातं. अमेरिकेसहित जगभरात देशांनी भारताकडून हे औषध मागवून घेतलं. कोरोनाविरोधात लढण्यासाठी बिहारमध्ये या औषधाचा पुरेसा साठा केला होता. डीएम कौशल राज शर्मा यांनी सांगितलं की, सध्याच्या घडीला वारणसीत 8 लाख गोळ्या उपलब्ध आहेत. या औषधाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचं एक स्टोरही वाराणसीत आहे, जिथून पूर्वांचलात या औषधाचा पुरवठा होतो. हे वाचा - डोक्याला बाशिंग अन् तोंडाला चांदीचा मास्क; कोरोना लॉकडाऊनमधील लग्नाचा निराळा थाट वाराणसीत कोरोनाव्हायरसची एकूण 101 प्रकरणं आहेत. त्यापैकी 68 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना काळात जणू गंगामाताच या रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरते आहे. संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.