जाहिरात
मराठी बातम्या / देश / अवघ्या 11 दिवसांत कोर्टाने दिली 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा

अवघ्या 11 दिवसांत कोर्टाने दिली 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा

अवघ्या 11 दिवसांत कोर्टाने दिली 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा

एकदा का न्यायालयात खटला गेला की त्या खटल्याचा निकाल कधी लागेल हे काही सांगता येत नाही

  • -MIN READ
  • Last Updated :

    बंगळुरू, 09 जुलैः एकदा का न्यायालयात खटला गेला की त्या खटल्याचा निकाल कधी लागेल हे काही सांगता येत नाही. वर्षांनूवर्ष एक खटला न्यायालयात सुरू असतो. काही खटले तर फिर्यादी किंवा आरोपीच्या मृत्यूनंतरही सुरूच असतात. पण कर्नाटक न्यायालयाने मात्र एक चांगला आदर्श सर्वांसमोर मांडला आहे. काही दिवसांपूर्वी चारित्र्यावर संशय घेऊन 75 वर्षीय पतीने आपल्या 65 वर्षीय पत्नीचा बंगळूरू येथ खून केला होता. या विचित्र खटल्याचा कर्नाटक न्यायालयाने अवघ्या 11 दिवसांमध्ये निकाल लावला आहे. चेन्नबसय्या (75) यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी पुतम्मा (65) यांची हत्या केली. कर्नाटकातील चित्रदुर्ग तालुक्यातील वळसे गावात 27 जूनला ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर प्रकरणाची योग्य ती चौकशी केल्यानंतर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. सुरूवातील चेन्नबसय्या यांनी यात त्यांचा कोणताही हात नसल्याचे सांगितले. पण पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. या घटनेचा तपास इतक्या जलदगतीने सुरू झाला की, अवघ्या दोनच दिवसांत पोलिसांनी आरोपपत्र दाखल करत फॉरेन्सिक लॅबचा अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालाच्या आधारे न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हेही वाचाः पश्चिम मुंबईमध्ये ‘या’ ठिकाणी होतोय मुसळधार पाऊस मध्य रेल्वेचा खेळ खंडोबा, या भागांमध्ये भरले पाणी महाराष्ट्राच्या ‘या’ भागांत हवामान खात्याने वर्तवला अतिवृष्टीचा इशारा

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात