मुंबई, 09 जुलैः मुंबईत शनिवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. आजही मुंबई आणि परिसरात सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अनेक लोकांनी पावसाचा जोर पाहता आज घरीच राहणं पसंत केलं आहे. तुफान पावसामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असताना पश्चिम रेल्वेही 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. नालासोपारा स्थानकात 2 रुळ संपूर्णपणे पाण्याखाली गेलेत. वसई, पालघर, बोरिवली, अंधेरी भागांमध्येही पाऊस कोसळतोच आहे. बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
Maharashtra: Rain lashes parts of Mumbai. Visuals from Santacruz – Chembur Link Road. pic.twitter.com/Nx2JVgZTvz
— ANI (@ANI) July 8, 2018
वसईत रात्रभर पावसाने हजेरी लावल्याने नालासोपारा स्टेशन परिसर जलमय झालाय. अनेक दुकानात, घरात पाणी शिरले आहे. चाकरमानी पाण्यातून मिळेल तशी वाट काढत कामावर जात आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी संततधार पाऊस पडतोय. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सखल भागात पाणी साठलेलं पहायला मिळतय.
Maharashtra: Rain lashes parts of Mumbai. Visuals from Khar Subway. pic.twitter.com/7ytT4tRpYH
— ANI (@ANI) July 8, 2018
दुसरीकडे नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. वसई विरार महानगरपालिका, पालघर, भोईसर एमआयडीसी, डहाणू इथं पाणी पुरवठा करणारे धामणी धरण 61 टक्के भरलं असून त्यात धरणाच्या खालच्या कवडास बंधाऱ्यातून सुर्या नदी मध्ये 2300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सुर्या नदीला पूर आलाय. हेही वाचाः महाराष्ट्राच्या ‘या’ भागांत हवामान खात्याने वर्तवला अतिवृष्टीचा इशारा Thailand Cave Rescue : गुहेत अडकलेल्या 6 मुलांना सुरक्षित बाहेर काढले! कुख्यात गुंड मुन्ना बजरंगीची जेलमध्येच गोळ्या घालून हत्या