मराठी बातम्या /बातम्या /देश /क्या बात है! 72 वर्षांच्या आजी अवघ्या दीड रुपयांना विकतात इडली; फायदा नाही तर 'या' कारणासाठी करतात व्यवसाय

क्या बात है! 72 वर्षांच्या आजी अवघ्या दीड रुपयांना विकतात इडली; फायदा नाही तर 'या' कारणासाठी करतात व्यवसाय

आजच्या या कठीण काळात त्यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे.

आजच्या या कठीण काळात त्यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे.

या वयातही त्या केवळ स्वतःच्या मानसिक समाधानासाठी जवळपास शंभर कुटुंबांना अवघ्या दीड रुपयात इडली-सांबार खाऊ घालत आहेत. आजच्या या कठीण काळात त्यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे.

    चेन्नई, 25 जानेवारी:  समाजाचं (Society) आपण काही तरी देणं लागतो आणि त्यासाठी आपण काही तरी केलं पाहिजे या भावनेतून समाजातल्या दुर्बल, गरजू नागरिकांना जमेल तशी मदत करणारे अनेक नागरिक देशात आहेत. समाजात पैशासाठी काहीही करायला तयार असणारे नागरिक बघून माणुसकीवरचा (Humanity) विश्वास उडत असताना स्वतःचं सर्वस्व समाजासाठी अर्पण करणाऱ्या अशा व्यक्तींमुळे दिलासा मिळतो. माणुसकीवरचा विश्वास अबाधित ठेवणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत चेन्नईतल्या (Chennai) 70 वर्षांच्या व्हेरोनिका (Veronica). या वयातही त्या केवळ स्वतःच्या मानसिक समाधानासाठी जवळपास शंभर कुटुंबांना अवघ्या दीड रुपयात इडली-सांबार खाऊ घालत आहेत. आजच्या या कठीण काळात त्यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे.

    70 वर्षांच्या व्हेरोनिका आणि त्यांचे 72 वर्षांचे पती निकोलस (Nicholas) चेन्नईतल्या आदमबक्कम परिसरातल्या एका घरात भाड्याने राहतात. निकोलस एका बँकेच्या एटीएमचे रखवालदार (ATM Security Guard) म्हणून काम करतात आणि त्यातून मिळणाऱ्या पगारातून दोघांचा उदरनिर्वाह चालवतात. इतकं अल्प उत्पन्न असूनही गेली 20 वर्षं व्हेरोनिका अगदी स्वस्त किमतीत इडली विकण्याचा छोटासा व्यवसाय करत आहेत. यातून काहीही नफा मिळवण्याचा त्यांचा उद्देश नाही, तर लोकांना पोटभर खाऊ घालण्याचं समाधान मिळवणं हेच त्यांचं ध्येय आहे.

    Amazon Insult National Flag का होतंय ट्रेंड? कारण वाचून तुम्हालाही येईल राग!

    सगळीकडे दहा रुपयांना एक इडली मिळत असताना व्हेरोनिका अवघ्या दीड रुपयात इडली आणि सांबार असा नाश्ता देतात. एवढंच नव्हे तर व्हेरोनिका स्वतः सकाळी लवकर कामासाठी घर सोडणाऱ्या मजुरांच्या वस्तीत जाऊन इडली-सांबारचा नाश्ता पोहोचवतात. त्यासाठी त्या कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारत नाहीत.

    व्हेरोनिका दररोज 300 रुपयांची इडली विकतात आणि तेच पैसे दुसऱ्या दिवशी इडली करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याकरिता वापरतात. 20 वर्षांपूर्वी त्यांनी हे काम सुरू केलं तेव्हा आधी त्या 50 पैशांना एक आणि त्यानंतर एक रुपयाला एक इडली विकत. आता इडली आणि सांबार असं मिळून त्या दीड रुपयाला विकतात. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात अनेकांना रोजगार मिळणं कठीण झालेलं असताना अवघ्या दीड रुपयात मिळणारा हा नाश्ता अनेकांची भूक भागवत आहे. जवळपास 100हून अधिक कुटुंबं त्यांच्या या इडली-सांबारवर अवलंबून असतात.

    या कामासाठी आजही व्हेरोनिका रोज पहाटे 3 वाजता उठतात आणि इडली-सांबार बनवण्याचं काम सुरू करतात. स्वतःच्या समाधानासाठी व्हेरोनिका यांनी हा सगळा खटाटोप सुरू केला असून, गेली 20 वर्षं हा वसा त्या निष्ठेनं चालवत आहेत, असं निकोलस यांनी सांगितलं. या कामात आपण किंवा आपल्या तीन विवाहित मुली कसलीही ढवळाढवळ करत नाही, असंही त्यांनी सांगितलं; मात्र अनेक प्रयत्न करूनही आम्हाला निवृत्तिवेतन मिळालेलं नाही, अशी खंत निकोलस यांनी व्यक्त केली.

    आधी केली एक चूक, त्यानंतर बाळाला कारमध्येच विसरले; घटनेचा थरारक VIDEO

    समाजात अनेक श्रीमंत नागरिक असतात; पण प्रत्येकाची दान करण्याची नियत असतेच असं नाही. त्याच वेळी अनेक गरीब नागरिक थक्क करण्यासारखी दानशूरता दाखवून अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालतात. व्हेरोनिका आणि निकोलस हे जोडपं त्यापैकीच एक आहे. अलीकडेच कर्नाटकमधल्या एका देवळाबाहेर भीक मागणाऱ्या केम्पाजी नामक वृद्ध महिलेनं जमा केलेली सगळी संपत्ती आपल्या आवडत्या महाबली मारुतीच्या मूर्तीला चांदीचा मुखवटा करण्यासाठी देवस्थानाकडे दान केली. भीक मागून जमवलेले तब्बल 20 हजार रुपये या वृद्ध महिलेनं आपलं श्रद्धास्थान असलेले भगवान अंजनेय अर्थात मारुतीच्या मंदिराचे मुख्य पुजारी दत्तू वासुदेव यांच्याकडे सुपूर्द केले. ही महिला काय किंवा व्हेरोनिका काय, आजच्या पैशाच्या मागे धावणाऱ्या माणसांच्या जगात एक वेगळाच आदर्श निर्माण करतात आणि त्यामुळे काही जणांना का होईना समाजासाठी काही करण्याची प्रेरणा मिळते.

    First published:
    top videos

      Tags: Chennai, Success stories