Home /News /viral /

Amazon Insult National Flag का होतंय ट्रेंड? कारण वाचून तुम्हालाही येईल राग!

Amazon Insult National Flag का होतंय ट्रेंड? कारण वाचून तुम्हालाही येईल राग!

Amazon

Amazon

Amazon Insult National Flag : ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन (Amazon) पुन्हा एकदा वादात सापडली आहे. भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने भारतीय तिरंगा ध्वज छापलेली काही उत्पादने विक्रीस ठेवली आहे. यामुळे अॅमेझॉनच्या विरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 जानेवारी : ऑनलाईन ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. #Amazon Insult National Flag सोमवारी सकाळपासूनच ट्विटरवर ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगसह हजारो ट्विट करण्यात आले आहेत. अनेक यूजर्स हा हॅशटॅग वापरून अॅमेझॉनविरोधात ट्विट करत आहेत. खरंतर, प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर, अॅमेझॉनने (Amazon) चॉकलेट आणि इतर अनेक उत्पादनांवर भारतीय ध्वज तिरंगा छापल्याने नेटिझन्स संतापले आहेत. यापूर्वीही अॅमेझॉनकडून अशा गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे यावेळी कडक कारवाई करण्याची मागणी नेटकरी करीत आहेत. भारतीय ध्वज छापलेला फेसमास्क अॅमेझॉनवर विक्रीस उपलब्ध झाला आहे. हा मास्क वापरल्यानंतर एकतर फेकून दिला जाईल किंवा धुतला जाईल, यामुळे तिरंग्याचा अपमान होईल, असे नेटकरी म्हणतायेत. अॅमेझॉनचा हेतू एकतर 'देशभक्ती'ला प्रोत्साहन देण्याचा किंवा निव्वळ कमाई करण्याचा होता, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. मात्र, भारतीय नेटिझन्स याने नाराज झाले आहे. Amazon कडून राष्ट्रध्वजाचा अपमान यापूर्वी देखील Amazon च्या यूएस शाखेने भारतीय तिरंग्याशी साध्यर्म असलेले शूज लेससाठी शूज आणि मेटल हूप्स विकले होते. भारत सरकारने ऑनलाइन शॉपिंग कंपनीला भारतीय संवेदना आणि भावनांचा आदर करण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर अॅमेझॉनने भारतीय ध्वजासह छापलेले डोअरमेट विकून लोकांच्या देशभक्तीच्या भावना दुखावल्याबद्दल तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची माफीही मागितली होती. Amazon विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ट्विटरवर ट्रेंडिंग या हॅशटॅगवर एका यूजरने लिहिले की, तिरंगा ध्वज असलेला टी-शर्ट ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर विकला जात आहे. याआधीही अॅमेझॉनने अनेकवेळा शूज आणि टॉयलेट सीट कव्हर, मास्क इत्यादी विकून भारताच्या तिरंग्याचा अपमान केला आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, अॅमेझोन आमच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करत आहे. आमचा अपमान करणारी सर्व उत्पादने त्यांनी परत घ्यावीत. सरकारने यावर कायदेशीर कारवाई करावी. हे खूप लाजिरवाणे आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Amazon

    पुढील बातम्या