Home /News /viral /

आधी केली एक चूक, त्यानंतर 1 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरले; घटनेचा थरारक VIDEO

आधी केली एक चूक, त्यानंतर 1 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरले; घटनेचा थरारक VIDEO

बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. गाडीभोवती गर्दी जमा झाली. बराच प्रयत्न केल्यानंतर गाडीचं लॉक उघडलं नाही.

    भोपाळ, 24 जानेवारी : छतरपुरमध्ये (Madhya Pradesh News) एक वर्षांचं बाळ कारमध्ये अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. बरेच प्रयत्न केल्यानंतर गाडीची काच तोडून बाळाला बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा एक व्हिडीओदेखील (Video) समोर आला आहे. तो पाहिल्यानंतर लोकांनी पालकांचा निष्काळजीपणा असल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील छतरपूर शहरातील आहे. येथील पन्ना रोडवर कुटुंबीय कारच्या आत चावीसह बाळालाही विसरले. यानंतर गाडी लॉक झाली आणि बाळ गाडीतच अडकलं होतं. कारचा लॉक उघडण्याचा पूरपूर प्रयत्न केला जात होता. मात्र ते शक्य होत नव्हती. शेवटी गाडीचा काच तोडून बाळाला बाहेर काढण्यात आलं. (Chhatarpur : One year old child trapped in car, glass was broken and taken out safely ) हे ही वाचा-एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे डोंगर; अरूंद रस्त्यावर वळवू लागला कार अन्.., VIDEO या घटनेत कुटुंबीयांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कुटुंबीय गाडी घेऊन फिरायला निघाले होते. उतरत असताना ते गाडीची किल्लीत आतच विसली आणि बाळ चिकूदेखील गाडीतच राहिला. खेळता खेळता बाळाने कारचं दार आतून लॉक केलं. ज्यामुळे बाळ कारमध्येच अडकला. 10 ते 15 मिनिटं तो आत खेळत राहिला. काही वेळानंतर मात्र तो रडू लागला. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. गाडीभोवती गर्दी जमा झाली. बराच प्रयत्न केल्यानंतर गाडीचं लॉक उघडलं नाही म्हणून ड्रायव्हिंग साईटची काच तोडण्यात आली आणि बाळाला बाहेर काढण्यात आलं. बाळाच्या मामाने सांगितलं की, त्याच्याकडून मोठी चूक झाली. वेळेत बाळाला बाहेर काढलं नसतं तर मोठी दुर्घटना घडली असती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh, Shocking viral video

    पुढील बातम्या