जाहिरात
मराठी बातम्या / देश / संपूर्ण शहराची स्टेअरिंग आता सहावी पास रिक्षाचालकाच्या हाती, 'या' शहराचा बनणार महापौर

संपूर्ण शहराची स्टेअरिंग आता सहावी पास रिक्षाचालकाच्या हाती, 'या' शहराचा बनणार महापौर

संपूर्ण शहराची स्टेअरिंग आता सहावी पास रिक्षाचालकाच्या हाती, 'या' शहराचा बनणार महापौर

Auto Driver Become Mayor: सहावी पास रिक्षाचालक एखाद्या शहराचा महापौर बनू शकतो, हा विचारही अनेकांना करवत नाही. पण चहा विक्रेते नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनत असतील तर एक रिक्षाचालक शहराचा महापौर बनूच शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

कुम्बकोनम, 04 मार्च: सहावी पास रिक्षाचालक एखाद्या शहराचा महापौर बनू शकतो, हा विचारही अनेकांना करवत नाही. पण चहा विक्रेते नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनत असतील तर एक रिक्षाचालक शहराचा महापौर बनूच शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण शहराचं स्टेअरिंग एका रिक्षाचालकाच्या हाती जाणार आहे. एका सर्वसामान्य रिक्षाचालकाला लोकांनी निवडणूक एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे. सरवनन असं 42 वर्षीय रिक्षाचालकाचं नाव असून ते तामिळनाडूतील (Tamilnadu) कुम्बकोनम (kumbakonam) शहराचे पहिले महापौर बनणार (6th passed auto driver will become first mayor) आहेत. सरवनन हे व्यवसायानं रिक्षाचालक असून मागील काही वर्षांपासून ते शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिले आहेत. 20 डिसेंबर 2021 रोजी कुम्बकोनम नगरपालिकेचं रुपांतर महानगर पालिकेत करण्यात आलं आहे. याचं पार्श्वभूमीवर कुम्बकोनम शहरातील 48 प्रभागांमध्ये नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत द्रमुक पक्षानं 42 जागांवर मुसंडी मारली आहे. तर सरवनन हे प्रभाग क्रमांक 17 मधून विजयी झाले आहेत. त्यामुळे आता द्रमुकने त्यांची महापौरपदासाठी निवड केली आहे. हेही वाचा- पोलीस व्हायचं स्वप्न बाळगलं पण परिस्थितीनं केला घात, साताऱ्यात तरुणीचा भयावह अंत भाड्याच्या खोलीत राहतात सरवनन हे मागील बऱ्याच काळापासून कुम्बकोनम शहरातील राजकारणात सक्रिय आहेत. ते 10 वर्षे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष होते. रिक्षाचालक म्हणून काम करत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला आकार दिला आहे. ते आपली पत्नी आणि तीन मुलांसह कुम्बकनोम शहरात राहतात. त्यांच्याकडे केवळ 4.55 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 25 हजार रुपये आहेत. त्यांचं शिक्षण सहावीपर्यंत झालं आहे. हेही वाचा- वाहतूक पोलिसांचा अजब कारभार;हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकालाच ठोठावला दंड तमिळनाडू कॉर्पोरेशन निवडणुकीत यावेळी डीएमकेला मोठे यश मिळालं आहे. पक्षानं प्रदेश पातळीवर संघटनेत बरेच सकारात्मक बदल केले आहेत. याचा फायदा पक्षाला चांगलाच झाला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत देखील द्रमुक पक्ष जोरदार मुंसडी मारेल, असा दावा अनेक राजकीय जाणकारांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात