Home /News /maharashtra /

Kalyan News: वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकालाच ठोठावला दंड

Kalyan News: वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकालाच ठोठावला दंड

वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकालाच ठोठावला दंड

वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकालाच ठोठावला दंड

Auto driver fined for not wearing helmet in Kalyan: कल्याण शहरात वाहतूक पोलिसांनी एका रिक्षा चालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड ठोठावण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

कल्याण, 4 मार्च : वाहतूक पोलिसांची ऑनलाइन दंड (Traffic Police Online fine) आकारणी प्रणाली अनेकदा काहींना डोकेदुखी ठरत असते. त्याचे ताजं उदाहरण कल्याण शहरात पाहायला मिळाले आहे. कल्याण शहरात (Kalyan City) राहणारे गुरुनाथ चिकणकर या रिक्षाचालकाला चक्क हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी 500 रुपयांचा दंड आकाराला आहे. (Kalyan Auto driver fined for not wearing helmet) मुंबईच्या कांदिवली भागात 3 डिसेंबर 2021 रोजी एक दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता, त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला, त्याचे हे चालान असल्याचे समोर आले आहे. मात्र आता या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाईन प्रणालीच्या इ चलनद्वारे रिक्षा चालक गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे. सुरुवातीला मोबाइलवर या दंडाच्या संबंधी माहिती आल्यानंतर रिक्षा चालक गुरुनाथला धक्काच बसला. त्यांनी याप्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले. मात्र माझी चूक नसतांना मी ठाणे येथे का जावे, वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी अशी मागणी गुरुनाथ ने केली आहे. वाचा : महिन्याला 5 हजार पगार घेणारा पालिकेचा माजी कर्मचारी झाला 238 कोटींचा मालक? आधीच कोरोनामुळे गेली दोन वर्ष आम्ही खूप कठीण परिस्थितीत दिवस काढले आहेत. आता कुठे गाडी रुळावर आली आहे. त्यात हा दंड रद्द करण्यासाठी ठाण्याला जावे लागल्यास पूर्ण दिवसाचा रोजगार जाईल आणि वेळही वाया जाईल. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून झालेली चूक तिचे निवारण प्रत्येक शहराच्या वाहतूक शाखेत करण्याची व्यवस्था वाहतूक विभागाने करावी अशी मागणी देखील रिक्षाचालक गुरुनाथ चिकनकर यांनी केली आहे. दरम्यान या सगळया प्रकरणामुळे गुरुनाथला मानसिक त्रास झाला आहे. आता या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी रिक्षा चालकाने केली आहे. तर वाहतूक पोलिसांनी आपल्या ई चलन पध्दतीत काम करतांना निदान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यालाच दंड आकारला जातो आहे का? याची माहिती नीट तपासून संबंधितांच्या मोबाइलवर दंड पाठवावा, अन्यथा अनेकांना या ई चलन प्रणालीचा नाहक त्रास होणार असल्याचे प्रतिक्रिया रिक्षा चालकाचे नातेवाईक मदन चिकणकर यांनी दिली आहे. वाचा : यवतमाळ हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, दगडाने ठेचलं मग चाकूने केले वार का आला असावा रिक्षा चालकाला विना हेल्मेटचा दंड? कांदिवली भागात जो दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता त्याला हा दंड आकारण्यात आला. मात्र त्याचा दंड हा कल्याणमधील रिक्षा चालकाला आला. यात दुचाकी चालकाने बोगस नंबर प्लेट लावलेली असावी आणि या नंबर प्लेटवर कल्याण शहरात रिक्षा चालवणाऱ्या गुरुनाथ चिकणकर यांच्या रिक्षाचा नंबर असावा, त्यामूळे हा दंड अधिकृत नंबर असलेल्या रिक्षा चालकाला आला असावा.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Autorickshaw driver, Crime, Kalyan

पुढील बातम्या