शिलॉंग, 26 जुलै : आसाम (Assam) आणि मिझोराम (Mizoram) या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये राज्यांच्या सीमांवरून (border issue) जोरदार हिंसाचार उफाळला आहे. सोमवारी झालेल्या हिंसाचाराला आवर घालण्याचं कर्तव्य बजावताना आसाम पोलिसांचे 6 जवान (6 police lost lives) धारातिर्थी पडले. इतर 50 पोलीस जखमी (50 police injured) झाले असून त्यांच्यावर सिलचरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. संघर्ष कशामुळे? आसाम आणि मिझोरामच्या नागरिकांमध्ये सीमेवरून गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्येकडील राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांची शिलॉंगमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला दोन दिवस होण्यापूर्वीच पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला असून दोन्हीकडचे नागरिक एकमेकांना भिडले आहेत. या जमावाला आवर घालताना अनेक पोलीस जखमी होत असून त्यातील 6 जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. झोपड्या जाळल्यामुळे हिंसाचार आसाम आणि मिझोरामच्या सीमाभागात राहणाऱ्या 8 शेतकऱ्यांच्या झोपड्यांना आग लागल्याच्या कारणावरून हा हिंसाचार उफाळला. अज्ञात समाजकंटकानं ही आग लावली असून त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र या आगीच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या धुसफुशीला तात्कालिक कारण मिळालं आणि संघर्षाला तोंड फुटलं. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच ट्विटर वॉर
Hon'ble @himantabiswa ji, as discussed I kindly urge that Assam Police @assampolice be instructed to withdraw from Vairengte for the safety of civilians. @narendramodi @AmitShah @PMOIndia @HMOIndia https://t.co/wHtMPhFRpP
— Zoramthanga (@ZoramthangaCM) July 26, 2021
दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारासाठी एकमेकांवर जबाबदारी ढकलली असून केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. दोन्ही राज्यांमधील नागरिक आणि पोलीस हे सीमेवर आमनेसामने आल्यामुळे संघर्ष वाढला असून अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून दोन्ही बाजूचे पोलीस जखमी होत असल्याचं चित्र आहे. हे वाचा - …. तर मीराबाईला मिळू शकतं Gold! चीनच्या विजेतीची होतेय डोपिंग टेस्ट गृहमंत्र्यांची मध्यस्थी गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात लक्ष घातलं असून आसाम आणि मिझोराम या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सामोपचाराने तोडगा काढण्याची विनंती केली आहे.