नवी दिल्ली 31 मार्च : डास मारण्यासाठी किंवा त्यांच्या चाव्यापासून वाचण्यासाठी अनेक लोक आपल्या घरांमध्ये कॉईलचा वापर करतात. कॉइलच्या वापराने डासांपासून अल्पावधीतच सुटका मिळू शकते, पण कॉइलचा वापर आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचंही अनेकदा सांगितलं जातं. मात्र, आता या कॉइलने सहा जीव घेतल्याची हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.
एक ठिणगी अन् 500 हून अधिक दुकानं जळून खाक, 8 तासांपासून सुरुय अग्नितांडव पाहा VIDEO
दिल्लीत डास मारण्यासाठी एक कुटुंब कॉइल पेटवून झोपल्यानंतर मोठी घटना घडली आहे. इथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात ही घटना घडली आहे.. डासांची कॉइल पेटवून झोपणं दिल्लीतील या कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे. या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर कोसळून देवाच्या दारात 35 जणांनी गमावला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, कॉइल पेटवून कुटुंब घरातच झोपलं होतं. त्यानंतर कॉइलमुळे रात्री उशीला आग लागली. ही आग इतकी पसरली की यात दोन जणांचा जळून मृत्यू झाला, तर गुदमरून 4 जणांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी त्यांना एका घरात अनेक लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथए डॉक्टरांनी 8 पैकी 6 जणांना मृत घोषित केलं. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi News, Shocking news