मराठी बातम्या /बातम्या /देश /इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर कोसळून देवाच्या दारात 35 जणांनी गमावला जीव

इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर कोसळून देवाच्या दारात 35 जणांनी गमावला जीव

ही विहीर मंदिर परिसरातील आहे. तिथे पूजेसाठी भाविक आले असताना ही दुर्घटना घडली.

ही विहीर मंदिर परिसरातील आहे. तिथे पूजेसाठी भाविक आले असताना ही दुर्घटना घडली.

ही विहीर मंदिर परिसरातील आहे. तिथे पूजेसाठी भाविक आले असताना ही दुर्घटना घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Indore, India

इंदूर : राम नवमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतानाच त्याला गालबोट लागलं आहे. एक भयंकर घटना घडली. पूजेसाठी आलेल्या भाविकांवर काळाने घात केला. कन्यापूजा सुरू असताना विहीर कोसळली. ही विहीर मंदिर परिसरातील आहे. तिथे पूजेसाठी भाविक आले असताना ही दुर्घटना घडली.

या विहिरीत 50 हून अधिक बुडल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ANI ने दिली आहे. तर स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन विभाग, पोलीस जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 15 हून अधिक मृतदेह हाती लागले. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोकाकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

Shocking : 250 प्रवासी घेऊन जाणाऱ्या जहाजाने समुद्रात घेतला पेट; 31 मृत्यू, 18 जणांचा शोध सुरू

First published:
top videos

    Tags: Accident, Indore, Indore News