मदुराई, 10 जानेवारी: तामिळनाडूमध्ये कोरोना (Corona)च्या भीतीने एका आईने आपल्या 3 वर्षाच्या मुलासह विष पिऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. घटना मदुराई येथील. महिलेचे वय सुमारे 23 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, या महिलेच्या कुटुंबातील कोरोनाच्या (Covid-19) भीतीमुळे एकूण 5 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील ३ जणांचे प्राण वाचले. मात्र आई आणि मुलाला वाचवता आले नाही. जोतिका असे मृत महिलेचे नाव आहे. ती पतीपासून विभक्त झाली होती. ती आई लक्ष्मीसोबत राहत होती.
जोतिकाचे वडील नागराज यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाला अर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 8 जानेवारीला जोतिकाला कोरोनाची लागण होती. जोतिकाने ही बातमी आईला दिली असता तिची आई कमालीची घाबरली. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी विष प्राशन केले.
हा प्रकार शेजाऱ्यांना दुसऱ्या दिवशी कळला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केले. मात्र जोतिका आणि तिच्या मुलाला वाचवता आले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.
तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने देखील सामान्य लोकांनी कोरोना संसर्गामुळे घाबरू नका असा सल्ला दिला आहे. कोणतेही चुकिचे पाऊल उचलू नका. विषाणूची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टर आणि हॉस्पिटलशी संपर्क साधून उपचार घ्या. असा सल्ला डॉक्टरांनी दिली आहे.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.