लखनऊ 28 डिसेंबर : आगीची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातील 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशातील मऊ येथे अचानक आग लागल्याने एक वेदनादायक दुर्घटना घडली. मढ येथील शहापूर गावात मंगळवारी रात्री उशिरा एका घराला अचानक आग लागील. यात एकाच कुटुंबातील पाच जण जिवंत जळाले. असं सांगितलं जात आहे की, कुटुंबातील लोक झोपेत असतानाच हा अपघात झाला आणि आग लागल्याने अचानक आरडाओरडा झाला. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. इमारतीच्या कुंपणावरून थेट कारवर झेप; बिबट्याचा 13 नागरिकांवर भयानक हल्ला, घटनेचा Shocking Video एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मऊचे जिल्हा दंडाधिकारी अरुण कुमार यांनी सांगितलं की, मऊ जिल्ह्यातील कोपागंज पोलीस स्टेशन अंतर्गत शाहपूर गावात घराला आग लागली. या आगीत एका कुटुंबातील 5 सदस्यांचा मृत्यू झाला. ज्यात एक महिला, 1 पुरुष आणि 3 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, वैद्यकीय आणि मदत पथकासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यात यश आलं. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, स्टोव्हमधून आग लागल्याचं प्राथमिक अहवालात म्हटलं गेलं आहे. प्रतिव्यक्ती चार लाख रुपयांची मदतही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. या घटनेनंतर परिसरात सध्या शोकाचं वातावरण आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली आहे. साताऱ्यातील तरुणाचा मनालीत मृत्यू, पॅराग्लायडिंगवेळी सेफ्टी बेल्ट निसटला अन्… शहापूर गावात राहणाऱ्या गुडिया राजभर (वय 32) हिचा विवाह डोहरीघाट येथील रमाशंकर यांच्याशी झाला होता. जवळपास पाच वर्षांपासून गुडिया तिच्या आठ, दहा आणि 12 वर्षांच्या तीन मुलांसह आणि बहिणीची 14 वर्षांची मुलगी यांच्यासह शाहपूर येथील झोपडीत राहत होती. मंगळवारी रात्री अचानक झोपडीत ज्वाळा निघू लागल्या. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच सदरचे एसडीएम हेमंत चौधरी, घोसीचे सीओ उमाशंकर उत्तम, कोपगंज एसओ अमित मिश्राही पोहोचले. सुमारे 30 मिनिटांनी आग विझवता आली. गुडिया राजभर, तिच्या बहिणीची मुलगी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. कोपगंज एसओने सांगितलं की, या घटनेत पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. डीएम अरुण कुमार यांनी सांगितलं की, आगीचं कारण तपासलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.