नवी दिल्ली, 31 मे : देशात कोरोनाव्हायरस (Coronavirus) इतक्या झपाट्याने पसरतो आहे की देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी जवळपास निम्मी प्रकरणं चौथ्या लॉकडाऊनमध्येच (lockdown 4.0) समोर आलीत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकूण कोरोना रुग्णांपैकी 47.20 टक्के रुग्णांची नोंद आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे. भारतात 24 मार्चपर्यंत 512 कोरोना रुग्ण होते. सर्वात पहिला लॉकडाऊन 25 मार्च रोजी लागू करण्यात आला होत, जो 21 दिवसांचा होता. या 21 दिवसांमध्ये कोरोनाव्हायरसची 10,877 प्रकरणं होती. त्यानंतर 15 एप्रिलपासून दुसरा लॉकडाऊन सुरू झाला जो 3 मे पर्यंत म्हणजे 19 दिवस होता. यादरम्यान 31,094 प्रकरणं समोर आली. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपला. 18 मे सकाळी आठपर्यंत 53,636 प्रकरणं आढळली. 18 मे ते 31 मे या चौथ्या लॉकडाऊनमध्ये 85,974 कोरोना प्रकरणांची नोंद आहे. रविवारी सर्वात जास्त रुग्णांची नोंद भारतात आज सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली. सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांत 8380 नवीन रुग्ण आढळले आणि 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे 7,964 नवीन रुग्ण आढळले तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला. हे वाचा - मोठी बातमी : लॉकडाऊन 5 मध्ये असा खुला होणार महाराष्ट्र, जाहीर केली नवी नियमावली आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाचे 89995 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 5164 रुग्णांचा मृत्यू झाला असून 86983 लोक बरे झाले आहेत. कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात 2,940 नवीन रुग्ण समोर आले आहेत तर 99 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण आल्यानंतर राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 65,168 वर पोहोचली आहे. देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन वाढवला जून महिन्यातही कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी नवी गाईडलाईन जाहीर केली आहे. हे वाचा - बीडमधून आनंदवार्ता! 29 रुग्णांची कोरोनवर मात, तीन तालुके झाले कोरोनामुक्त ग्रीन, रेड, ऑरेंज झोन रद्द करुन केवळ कंटेन्मेंट झोन असणार आहे. चित्रपटगृह, स्विमिंग पूल, जिम, आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद राहणार आहे. दुकानांमध्ये केवळ 5 लोक एकावेळी खरेदी करु शकतात. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोक उपस्थित राहू शकतात, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. यासाठी पासची आवश्यकता नसणार आहे. 8 जूननंतर कंन्टेमेट झोनशिवाय इतर ठिकाणी सर्व मंदिर, मॉल, शॉप्स खुले होतील. राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती विचार लक्षात घेत शाळा कॉलेज याचा विचार करावा अथवा पुन्हा जून अखेर आढावा घेऊन जुलै महिन्यात सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. हे वाचा - …आणि लिफ्टच्या दरवाजाला लटकली चिमुरडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.