हुबेई, 31 मे : तुम्ही तुमच्या मुलांसह (child) लिफ्टजवळ (lift) गेला असाल तर त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांना एकटं सोडू नका. कारण नुकताच असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर धडकीच भरेल. एक 2 वर्षांची चिमुरडी एकटीच लिफ्टच्या आत गेली आणि त्यानंतर तिच्यासोबत काय झालं, ते लिफ्टच्या आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
ही घटना आहे चीनच्या (china) हुबेई (hubei) प्रांतातील. 2 वर्षांची चिमुरडी लिफ्टमध्ये एकटीच गेली. तिच्या हाताला सुरक्षा पट्टा बांधलेला होता. लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट खाली जाऊ लागली. तशी ही मुलगी लिफ्टच्या छताच्या दिशेने खेचली आहे. काही वेळ ही मुलगी अशीच लटकत होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटच येईल.
Heart-stopping moment! Toddler walked into the elevator alone with leash attached to her wrist. When the elevator started, she got hung up by the leash for over a minute. Luckily, the elevator went into an emergency halt. Please watch your children at all times! pic.twitter.com/ZWTMstPu7F
मिळालेल्या माहितीनुसार, 2 वर्षांची ही मुलगी एका महिलेसह लिफ्टजवळ उभी होती. तिच्या हाताला सुरक्षा पट्टाही बांधलेला होता. या पट्ट्याचं एक टोक त्या महिलेच्या हातात होतं. लिफ्ट उघडताच मुलगी एकटीच आत गेली आणि ती महिला लिफ्टबाहेर राहिली.
सुदैवानं लिफ्टची इमर्जन्सी सिस्टम आपोआप सक्रिय झाली आणि काही मिनिटानंतर लिफ्ट हळूहळू वर गेली आणि मुलगी पुन्हा जमिनीवर आली, तिला कोणतीही दुखापत झालेली नाही.