सातारा, 08 ऑगस्ट: केरळ (Kerala) राज्यातील एका बँकेतील तब्बल तीन कोटी रुपये किमतीच्या (3 Crore worth gold theft) साडेसात किलो सोन्यावर डल्ला मारल्याच्या (Gold Robbery) गुन्ह्यात चार जणांना अटक (4 Arrest) करण्यात आली आहे. केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शुक्रवारी रात्री चार जणांनी साताऱ्यातील (Satara) एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं आहे. संबंधित चारही आरोपींना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्यांना पुढील तपासासाठी केरळात नेण्यात आलं आहे. संशयित आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
काही दिवसांपूर्वी केरळातील एका बँकेत मोठी चोरी करण्यात आली आहे. चोरट्यांनी बँकेतील तब्बल साडेसात किलो सोन्यावर डल्ला मारला होता. याची बाजारातील किंमत तब्बल 3 कोटीहून अधिक आहे. केरळ पोलिसांकडून तपास सुरू असताना, या घटनेचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले होते. नाशिक येथील निक जोशी हा या चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर केरळ पोलिसांनी आपला तपास नाशिकच्या दिशेनं फिरवला. पण आरोपी पोलिसांच्या जाळ्यात काही सापडला नाही.
हेही वाचा-200च्या नोटेपासून बनवल्या 2000च्या हुबेहूब नोटा; पण याठिकाणी टॅलेंटनं खाल्ला मार
संशयित आरोपी निक जोशी वारंवार आपली जागा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. पण गेल्या काही दिवसांपासून आरोपी जोशी हा साताऱ्यात लपून बसल्याची गुप्त माहिती केरळ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे केरळ पोलीस शुक्रवारी साताऱ्यात दाखल झाले. याची सर्व माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली. संशयित जोशी हा साताऱ्यात महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका हॉटेलमध्ये आपल्या दोन साथीदारांसह तसेच कोरेगाव तालुक्यातील एका मित्रासमवेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हेही वाचा- बाईक चोरी करायची, पेट्रोल संपलं की तिथेच सोडून द्यायची, अखेर चोराला घडली अद्दल...
यानुसार पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापा टाकत जोशी आणि त्याच्या सातारा व कोरेगावातील तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर आरोपींची सातारा येथे प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर सातारा पोलिसांनी चौघांना केरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक महागडी चारचाकी गाडी देखील जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास केरळ पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold robbery, Kerala, Satara