• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • लवकरच Coronaवर उपचारासाठी Nasal Spray, नाका-तोंडाद्वारे देणार डोस

लवकरच Coronaवर उपचारासाठी Nasal Spray, नाका-तोंडाद्वारे देणार डोस

जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरसवर (Virus) औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्यापपर्यंत इम्युनिटी वाढवणारी लस याशिवाय दुसरे काहीही सापडलेले नाही.

  • Share this:
    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: Second Generation Vaccination : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस (Corona Virus) महामारीला आता जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पण त्याचा शेवट अद्याप निश्चित झालेला नाही. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरसवर (Virus) औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापपर्यंत इम्युनिटी वाढवणारी लस याशिवाय दुसरे काहीही सापडलेले नाही. आज या महामारीचा अंत दिसत नसताना आता शास्त्रज्ञांनी दुसऱ्या पिढीची (Second Generation) लस तयार करण्यावरही लक्ष केंद्रित केलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) यांनी म्हटलं की, आता नेजल स्प्रे (Nasal Spray)आणि तोंडावाटे लस (Oral Version) तयार करण्यावर भर दिला जात आहे. म्हणजेच ती नाक आणि तोंडाद्वारे दिली जाणार आहे. हेही वाचा- Corona Virus Updates: गोळ्या घेऊन बरा होणार COVID-19, लवकरच मिळू शकते मंजुरी
     डॉ. सौम्या म्हणतात, 'या प्रकारच्या लसीचा फायदा असा होईल की ती घेण्यासाठी तुम्हाला दीर्घ प्रक्रियेतून जावं लागणार नाही. तुम्ही ते स्वतः वापरू शकता. यासाठी, तुम्हाला लस घेण्यासारख्या दीर्घ प्रक्रियेतून जावं लागणार नाही. तसंच तुम्हाला इंजेक्शननं वेदनाही होणार नाहीत.
    डॉ. सौम्या (Dr Soumya Swaminathan) पुढे म्हणाले की, जेव्हा या नवीन पिढीच्या लसी बाजारात उपलब्ध होतील, तेव्हा अनेक प्रकारचे अडथळे दूर होतील. सध्या लोकांवर दुसऱ्या पिढीच्या 129 लसींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. त्याच वेळी, 194 लसींची प्रयोगशाळेत चाचणी सुरू आहे. नाकाद्वारे देण्यात येणारी लस प्रभावी का? डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) यांनी सांगितलं की, इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन (Influenza Vaccine) नाकातून दिली जाते. अशा परिस्थितीत जेव्हा कोरोनाची लस नाकातून दिली जाते तेव्हा प्रथम नाकात अँटीबॉडीज (Antibodies) तयार होतील. यामुळे श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत व्हायरस पोहोचणं कठीण होईल. याचा परिणाम असा होईल की नाकाद्वारे लस घेणाऱ्यांच्या फुफ्फुसात व्हायरस पोहोचू शकणार नाही आणि त्यामुळे कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. अशा परिस्थितीत या प्रकारची लस अधिक प्रभावी ठरू शकते. हेही वाचा-   दगडाने ठेचून युवकाची हत्या; 10 दिवसांतील दुसरी घटना, नागपुरात खळबळ
     लस 100% सुरक्षित?
    डॉ स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) म्हणतात की, कोरोनाची कोणतीही लस 100% सुरक्षित आणि प्रभावी नाही आहे. कोणतीही लस कंपनी दावा करू शकत नाही की त्यांची लस 100% प्रभावी आहे. पण होय, ही लस शून्याच्या तुलनेत 90% प्रभावी आहे, त्यामुळे संसर्गापासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यासोबतच त्या म्हणाल्या की, सध्या जी कोरोनाची लस घेतली जात आहे ती ठीक आहे, पण आपण त्यांचाही विचार केला पाहिजे.
    Published by:Pooja Vichare
    First published: