जाहिरात
मराठी बातम्या / देश / रात्री एकाच खोलीत झोपले अन् सकाळी आढळले कुटुंबातील तिघांचे मृतदेह, त्या घरात काय घडलं?

रात्री एकाच खोलीत झोपले अन् सकाळी आढळले कुटुंबातील तिघांचे मृतदेह, त्या घरात काय घडलं?

पोलीस (फाईल फोटो)

पोलीस (फाईल फोटो)

थंडीपासून बचाव करण्याकरिता घरातील एका खोलीत पेटवलेली शेकोटी एका कुटुंबाच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. या दुर्घटनेत पती-पत्नी आणि त्यांची चार वर्षाची मुलगी मृत्यूमुखी पडली आहे

  • -MIN READ Trending Desk Uttar Pradesh
  • Last Updated :

    लखनऊ 02 जानेवारी : सध्या हिवाळा सुरू आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक घरात हिटरसारखी उपकरणं लावतात किंवा छोटी शेकोटी पेटवतात. पण या गोष्टींमुळे अपघात, दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे दक्षता घेणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे खोलीत गुदमरून एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. थंडीमुळे घरात शेकोटी पेटवल्याने ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. राजस्थानमध्ये वांद्रे-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसचा पहाटे अपघात, अनेक प्रवासी जखमी `आज तक`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. थंडीपासून बचाव करण्याकरिता घरातील एका खोलीत पेटवलेली शेकोटी एका कुटुंबाच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. या दुर्घटनेत पती-पत्नी आणि त्यांची चार वर्षाची मुलगी मृत्यूमुखी पडली आहे. थंडीपासून बचावासाठी या कुटुंबाने घरात शेकोटी पेटवली आणि घराचे सर्व दरवाजे बंद करून कुटुंबातील सदस्य झोपले, अशी चर्चा आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेरठ येथील टीपी नगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या व्यावसायिक आलोक बन्सल यांच्या घरी चंदर (वय 38) हा नोकराचं काम करत होता. चंदर मूळचा नेपाळमधील चाऊमाला जिल्ह्यातील कैलाली येथील रहिवासी आहे. चंदर याची पत्नी राधा (वय 35) आणि मुलगी अंजली (वय 4) त्याच्यासोबत बन्सल यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत राहत होते. Tamilnadu Crackers Fire : घरी फटाके बनवायचे; रात्री अचानक झाला स्फोट,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ``31 तारखेला रात्री घराच्या टेरेसवर शेकोटी झाल्यानंतर काही लाकडं शिल्लक राहिली होती. चंदरने ही लाकडं घरी नेऊन खोलीत शेकोटी पेटवली आणि खोलीचं दार बंद केलं. यामुळे गुदमरून तीन जणांचा मृत्यू झाला. यानंतर मी 112 क्रमांकावरून पोलिसांना माहिती दिली. चंदर खोलीत शेकोटी पेटवून आपल्या कुटुंबासह झोपी गेला. 1 जानेवारीला दुपारी चारवाजेपर्यंत खोलीतून कोणीच बाहेर आले नाही. त्यामुळे मी चंदरला पाहण्यासाठी गेलो असता, खोली आतून बंद होती. प्रयत्न करून खोलीचं दार उघडलं असता, आतील दृश्य पाहून मला धक्का बसला,`` अशी माहिती अलोक बन्सल यांनी दिली. खोलीत पती चंदर, त्याची पत्नी राधा यांचा मृत्यू झाला होती. त्यांची चार वर्षांची मुलगी अंजली बेशुद्ध होती. तिला तातडीने मेरठमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दुर्देवानं तिचाही मृत्यू झाला. ``चंदर माझ्या घरी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून काम करत होता,`` अशी माहिती बंसल यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात