Home /News /national /

Breaking! महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर गेला मार्मला धबधब्यात वाहून, केरळमध्ये शोधकार्य सुरू

Breaking! महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर गेला मार्मला धबधब्यात वाहून, केरळमध्ये शोधकार्य सुरू

महाराष्ट्रातील अभिषेक (Abhishek) नावाचा एका नेव्ही ऑफिसर (Navy Officer) केरळमधील मार्मला धबधब्यात (Marmala waterfall) वाहून गेल्याची घटना घडलीय.

    तिरुवनंतरपुरम, 1 ऑगस्ट : महाराष्ट्रातील अभिषेक (Abhishek) नावाचा एका नेव्ही ऑफिसर (Navy Officer) केरळमधील मार्मला धबधब्यात (Marmala waterfall) वाहून गेल्याची घटना घडलीय. या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला असून शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे. एका नेव्ही ऑफिसरला अशा दुर्घटनेला सामोरं जावं लागल्यामुळं आश्चर्य आणि दुःख व्यक्त होत आहे. असा घडला अपघात नेव्ही ऑफिसर अभिषेक नेव्हीतील त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत केरळमधील मार्मला धबधब्याच्या प्रवाहात पोहत होता. यावेळी सर्वजण एकत्रितपणे पोहत असताना अचानक अभिषेक पाण्याच्या प्रवाहाने वेगळ्या दिशेला खेचला गेला. पाहता पाहता पाण्याचा प्रवाह वाढत गेला आणि पाण्याच्या वाढत्या वेगापुढे अभिषेकला पुन्हा काठ गाठणं शक्य होईना. अभिषेकनं पूर्ण ताकदीनिशी परत येण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो तग धरू शकला नाही, असं त्याच्या साथीदारांनी सांगितलं. अभिषेक हा 28 वर्षाचा तरुण नुकताच नेव्हीत दाखल झाला होता आणि पोहण्यात तो पटाईत असल्याचं त्याचे सहकारी सांगतात. अभिषेकला शोधण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु असलं, तरी अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. हे वाचा -तरुणानं अमानुष मारहाण करत घेतला लहान भावाचा जीव; फक्त 500 रुपये ठरले कारण इतर आठ जणांसोबत तो सध्या केरळला भेट देण्यासाठी आला होता. मात्र धबधब्याच्या महाकाय प्रवाहापुढे तो तग धरू शकला नाही. नागरिकांनी पर्यटनस्थळी गेल्यावर खोल पाण्यात उतरू नये आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, अशी सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Kerala, Water fall

    पुढील बातम्या