क्या बात है! अवघ्या 18 तासात 25 किमी डांबरी रस्ता पूर्ण; लिम्का बुकमध्ये नोंद आणि गडकरींकडून कौतुकाची थाप

क्या बात है! अवघ्या 18 तासात 25 किमी डांबरी रस्ता पूर्ण; लिम्का बुकमध्ये नोंद आणि गडकरींकडून कौतुकाची थाप

सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका 25 किमी रस्त्याचं काम अवघ्या 18 तासांत पूर्ण करण्याचा पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे.

  • Share this:

सोलापूर, 26 फेब्रुवारी: सरकारी काम खूप धिम्या गतीने असतं, याचा अनुभव समस्त भारतीयांना आहे. पण भारतीयांच्या याच मानसिकतेला छेद देणारी एक बातमी समोर आली आहे. सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका 25 किमी रस्त्याचं काम अवघ्या 18 तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' (Limca Book off Records) घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ते विजापूर दरम्यान 110 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहे. हा रस्ता चौपदरी आहे. पण या मार्गावर 25.54 किमीचा रस्ता केवळ 18 तासांत तयार करण्याचा विक्रम संबंधित ठेकेदार कंपनीने केला आहे. यासाठी 500 मजूरांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदार कंपनीचं आणि 500 कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

यावेळी त्यांनी सांगितलं की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सोलापूर ते विजापूर या महामार्गावार 110 किमीचं काम सुरू आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता चौपदरी असून दळणवळाच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर ठरणार आहे. याच रस्त्यावरील 25.54 किलोमीटर लांबीचा एक पदरी रस्ता अवघ्या 18 तासात तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या कामाची नोंद लिम्बा बुक ऑफ रिकॉर्डमध्ये केली जाणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे.

हे ही वाचा-नथुराम गोडसेची मूर्ती स्थापन करण्यात सहभागी नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हा महामार्ग ऑक्टोबर 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. सोलापूर ते विजापूर हा महामार्ग पूर्व महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. NH52 म्हणून ओळखला जाणाऱ्या या रस्त्यावर सोलापूर आणि विजापूर दरम्यान अनेक बायपास रस्ते काढले जाणार आहेत. तसेच या मार्गात सहा उड्डाणपूलही बांधण्यात येणार आहेत.

Published by: News18 Desk
First published: February 26, 2021, 7:28 PM IST

ताज्या बातम्या