नथुराम गोडसेची मूर्ती स्थापन करण्यात सहभागी नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नथुराम गोडसेची मूर्ती स्थापन करण्यात सहभागी नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे मारेकरी नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) मुद्यावर भाजपावर टीका करणारी काँग्रेस आता या प्रकरणावर अडचणीत आली आहे. काँग्रेसनं एका ‘गोडसे भक्त’ नेत्याचं पक्षात स्वागत केलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 26 फेब्रुवारी : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे मारेकरी नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) मुद्यावर भाजपावर टीका करणारी काँग्रेस आता या प्रकरणावर अडचणीत आली आहे. काँग्रेसनं एका ‘गोडसे भक्त’ नेत्याचं पक्षात स्वागत केलं आहे. बाबूलाल चौरासिया (Babulal Chaurasia) असं या नेत्याचं नाव आहे.  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाहलेरमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्वाहलेरमध्ये 2017 साली नथुराम गोडसेची मूर्ती स्थापन करण्याच्या कार्यक्रमात चौरासिया सहभागी झाले होते.

‘जन्मापासून काँग्रेसी’

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात चौरासिया यांनी सांगितले की, ‘मी जन्मत: काँग्रेसी आहे. पालिका निवडणुकीत मला पक्षानं तिकीट दिलं नव्हतं. त्यामुळे मी काँग्रेसचा त्याग केला होता. त्यानंतर मी हिंदू महासभेत प्रवेश केला. हिंदू महासभेकडून निवडणूक देखील जिंकली. त्यानंतर त्या पक्षाची विचारधारा माझ्यासाठी योग्य नसल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बाबूलाल चौरासिया हे नथुराम गोडसेच्या मुर्तीची स्थापना करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. इतकचं नाही तर ते गेल्या तीन वर्षांपासून नथुराम गोडसे जयंती कार्यक्रमालाही उपस्थित होते. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांची भाषा बदलली आहे. त्यांनी हिंदू महासभेवर आपली दिशाभूल केल्याचा आरोप केला.

I am a Congressman by birth. I left the party after I was denied the party ticket to municipal corporation elections. I had joined Hindu Mahasabha, contested & won the election. Later, I realised that I don't fit into their ideology: Gwalior corporator Babulal Chaurasia pic.twitter.com/JEAnSrTgJV

— ANI (@ANI) February 25, 2021

काँग्रेसकडून राहुल गांधींचा दाखला

काँग्रेस आमदार प्रवीण पाठक यांनी चौरासिया यांच्या पक्षप्रवेशाचा बचाव केला आहे. ‘चौरासिया हे यापूर्वी देखील काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी पक्षात पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो, असं पाठक यांनी सांगितलं. पाठक यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दाखला दिला. ‘आमच्या पक्षात वडिलांच्या मारेकऱ्याला माफ करणारे राहुल गांधी यांच्यासारखे नेते आहेत,’ असं त्यांनी सांगितलं.

( वाचा : बंगालमध्ये BJP ची जोरदार मोर्चेबांधणी, प्रसिद्ध खेळाडूनंतर आता या 'बंगाली Beauty'चा भाजप प्रवेश )

भाजपनं या मुद्यावर काँग्रेसवर टीका करण्याची संधी साधली आहे. ‘आमचा आणि हिंदू महासभेचा काहीही संबंध नाही हे आम्ही पूर्वीपासून सांगत आलो आहोत. आता सत्य समोर आलं आहे. भाजपाची राज्यातील प्रतिमा खराब करण्याचा कट काँग्रेसची काही मंडळी रचत आहेत,’ असा आरोप प्रदेश भाजपा प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी केला आहे.

Published by: News18 Desk
First published: February 26, 2021, 6:33 PM IST

ताज्या बातम्या