जाहिरात
मराठी बातम्या / देश / 2008 Ahmedabad Blast:2008 अहमदाबाद स्फोट: 70 मिनिटे, 21 स्फोट, 56 मृत्यू...अधिकाऱ्यानं सांगितलं कसं सोडवलं अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण

2008 Ahmedabad Blast:2008 अहमदाबाद स्फोट: 70 मिनिटे, 21 स्फोट, 56 मृत्यू...अधिकाऱ्यानं सांगितलं कसं सोडवलं अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण

2008 Ahmedabad Blast:2008 अहमदाबाद स्फोट: 70 मिनिटे, 21 स्फोट, 56 मृत्यू...अधिकाऱ्यानं सांगितलं कसं सोडवलं अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण

गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 56 जणांना आणि 200 हून अधिक जखमी झालेल्यांना शुक्रवारी न्याय मिळाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदाबाद, 19 फेब्रुवारी: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 56 जणांना आणि 200 हून अधिक जखमी झालेल्यांना शुक्रवारी न्याय मिळाला. विशेष न्यायालयाने (Special Court) 38 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अवघ्या 70 मिनिटांत संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र त्या काळात या प्रकरणाच्या तपासात गुंतलेले पोलीस या तपासाला मोठं आव्हान मानतात. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त जितेंद्र यादव आणि या प्रकरणाच्या तपासात सहभागी होते. ते तत्कालीन उपायुक्त अभय चुडासामा यांचा संदर्भ देत म्हणतात, स्फोटानंतर आम्ही 5 दिवस झोपू शकलो नाही. तो काळ खूप आव्हानात्मक होता. आमच्या समोर माणसे मरत होती आणि आमच्याकडे काहीच लीड नव्हती. पाचव्या दिवशी (अभय) चुडासमाला दहशतवाद्यांचा तळ बारूचजवळ असल्याची मोठी माहिती मिळाली. पोलिसांचे पथक भरूचला पोहोचले. या वेळी हल्लेखोर पळून गेले असले तरी, पथकाला परिसरातून काही मोबाईल क्रमांक सापडले, जे लीड मिळविण्यासाठी उपयुक्त ठरले. IND vs WI : टीम इंडियाच्या विजयानंतरही रोहित नाराज, खेळाडूंची केली कानउघडणी यादव म्हणाले, हा बॉम्बस्फोट आपल्या देशाविरुद्धच्या कटाचा भाग होता. जयपूर, दिल्ली येथे स्फोट झाले आणि सुरतमध्येही असेच प्रयत्न झाले. सिमीचे सदस्य पुन्हा एकदा इंडियन मुजाहिदीनच्या रुपात पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. एकही गुन्हेगार सुटलेला नाही. आज देशात आयएम संपले आहे. त्यादरम्यान अहमदाबाद पोलिसांनी मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील समकक्षांशी संपर्क साधला. गुप्तचर माहिती शेअर केल्यानंतर अहमदाबाद, वडोदरा आणि जयपूरमध्ये हल्ला करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकांची माहिती मिळाली. ते म्हणाले, आम्हाला कळलं की स्फोटापूर्वी अहमदाबादमध्ये दोन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली होती. ही शिबिरे हालोल जवळील जंगली भागात आयोजित करण्यात आली होती. दक्षिण केरळ आणि कर्नाटकमध्येही अशा प्रकारचे प्रशिक्षण सत्र आयोजित केल्याचे आम्हाला समजले आणि आम्ही तेथील लोकांची चौकशी करू लागलो. या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सिमीचा तत्कालीन प्रमुख सफदर नागौरी आणि कमरुद्दीन नागौरी याचीही सहभाग आहे. या दोघांनी केरळच्या जंगलात सुमारे 50 जणांना स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण दिल्याचं सांगितलं जातं. Ranji : आईने मुलाच्या बॅटसाठी दागिने ठेवले गहाण, पोरानं 22 व्या वर्षीच केला वर्ल्ड रेकॉर्ड   यादव म्हणाले, अब्दुल आणि यासीन भटकल हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार होते. ते पुण्यात होते जिथून आम्ही त्यांना पकडले. त्यांना पाकिस्तानातील ISI कडून सूचना मिळत होत्या. बाटला हाऊस चकमक हा अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या तपासाचा परिणाम होता. तपासादरम्यान क्षेत्रीय ऑपरेशन आणि तांत्रिक पथकाचे प्रमुख असलेले यादव यांनी सांगितलं की, पहिली अटक स्फोटानंतर 15 दिवसांनी झाली आणि 15 नोव्हेंबर 2008 पर्यंत गुजरात पोलिसांनी जवळपास सर्वच गुन्हेगारांना पकडलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात