Home /News /national /

धक्कादायक! अंत्यसंस्काराची वाट पाहतंय 2 महिन्यांचं बाळ; पालकांनी Hospital मधून काढला पळ

धक्कादायक! अंत्यसंस्काराची वाट पाहतंय 2 महिन्यांचं बाळ; पालकांनी Hospital मधून काढला पळ

या बाळाच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांना रुग्णालयातूनच पळ काढला. त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही.

  जम्मू, 5 मे : दोन महिने बाळाचा कोरोनाने (Coronavirus take life of new born in jammu) मृत्यू झाल्यावर पालकांनी त्याचे अंत्यविधी तर केले नाहीतच, मूलाचं शव ताब्यात घ्यायलाही ते तयार नव्हते. पालकांनी मृतदेह न स्वीकारताच रुगणालयातून पळ काढला आहे. जम्मूच्या हॉस्पिटलमध्ये हे बाळ आता बेवारस म्हणून ठेवण्यात आलं आहे. कोराना काळात (Corona Pandemic) जिथे इच्छा असूनही माणूस माणसाला मदत करू शकत नाही. तिथे 9 महिने पोटात वाढलेल्या अर्भकाबद्दल आई-वडिलांनी एवढी निष्ठूरता दाखवली आहे. आपली जवळची व्यक्ती जेव्हा रुग्णालयात दाखल होते. तेव्हा ती घरी परत येण्यासाठी घरचे लोक देवाला प्रार्थना करतात. अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तींना कोरोनामुळे गमवालं लागलं आहे. त्यांच्या मृतदेहावर व्यवस्थित अंत्यसंस्कार करता आले नाहीत म्हणून हे लोक हळहळत आहेत. अशात जम्मूमधून ही धक्कादायक माहिती येत आहे. पालकांनी आपल्या अवघ्या 2 महिन्यांच्या बाळाचा (2 Moths Baby abandoned in Jammy due to corona) चा कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह स्वीकारण्याऐवजी हॉस्पिटलमधूनच पळ काढला आहे. हे बाळाला हृदयाशी संबंधित त्रास होत असल्याने त्याला जम्मू मधील श्री महाराजा गुलाब सिंग रुग्णालयात (Shri Maharaja Gulab Singh Hospital) दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची कोव्हिड टेस्ट करण्यात आली. टेस्ट पॉझिटीव्ह आल्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. या उपचारांना बाळाने प्रतिसाद दिला नाही.  त्यातच या बाळाचा रविवारी मृत्यू झाला.

  पुणे- कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह सासरच्यांनी नाकारला; माहेरच्या सरपंचामुळे गावच्या लेकीवर झाले अत्यंसंस्कार

   या बाळाच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांना रुग्णालयातूनच पळ काढला. रुग्णालयाने पालंकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, कोणताच प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे बाळाचा मृतहेद शवागारात ठेवण्यात आला आहे. अजूनही पालकांशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्नही रुग्णालय करत आहे.
  येत्या काही दिवसांत पालकांनी मृतदेह स्वीकारला नाही तर, हॉस्पिटल प्रशासन कोरोना प्रोटोकॉल पाळून मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार आहे, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. कोरोनाकाळात लोकांना असहाय्य लोकांना मदतीचे हात पुढे केले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही लोक पुढे येत आहे. पारनेर तालुक्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी कोरोनाबाधित मुलगा अंत्यविधी करू शकत नसल्याने त्याच्या वडिलांवर स्वतः अंत्यस्कार केल्याची बातमी महिनाभरापूर्वीच आली होती. या घटनांनी माणुसकी जिवंत असल्याची जाणीव होते. पण जेव्हा जम्मू सारख्या घटना घडतात तेव्हा खरंच कोरोनाने माणुसकी संपवली असं वाटतं.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Coronavirus, Jammu kashmir

  पुढील बातम्या