गाझियाबाद, 25 ऑक्टोबर : श्रीमंतांच्या घरी चोऱ्या करून (Police arrested thief who built road for wifes election) आपल्या पत्नीच्या निवडणुकीसाठी पैसे जमवणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात त्याने आपला हात साफ करत लाखो रुपये कमावले होते. आपल्या पत्नीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आणण्यसाठी पैशांची जमवाजमव करत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अशी करायचा चोरी गाझियाबादमध्ये राहणारा इरफान उर्फ उजाले हा अट्टल चोर होता. मोठमोठ्या घरांमध्ये तो एकटाच प्रवेश करायचा आणि यशस्वीपणे चोऱ्या करून परत यायचा. काळे कपडे घालून घरात घुसणाऱ्या इरफान आतापर्यंत कुणीच पकडू शकलं नव्हतं. गोव्याच्या माजी राज्यपालांच्या घरातही त्याने चोरी केल्याचं सांगितलं जात होतं. दिल्लीसह देशातील अनेक राज्यांत त्यानं आव्हानात्मक वाटणाऱ्या चोऱ्या यशस्वीपणे केल्या होत्या. पत्नीला बनवायचं होतं नेता आपल्या पत्नीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला उभं करून निवडून आणण्याचा त्याचा इरादा होता. त्यासाठी चोरीच्या पैशातून त्याने गावात एक रस्ताही बांधला होता. वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करून त्याने बरीच संपत्ती गोळा केली होती. त्यातील बरीचशी मालमत्ता त्याने आपल्या मित्रांकडे दिली होती. त्याच्या मित्रांकडून पोलिसंनी जग्वार आणि स्कॉर्पिओ या गाड्या जप्त केल्या आहेत. हे वाचा- 12 वर्षाच्या मुलीने थेट पोलीस अधिकारी वडिलांचाच केला खून; कारण ऐकून चक्रावून जाल अशी करायचा चोरी इरफानच्या टीममध्ये त्याच्या 10 ते 12 गर्लफ्रेंड होत्या. या तरुणी वेगवेगळ्या प्रकारे त्याला चोरीसाठी मदत करत असत. ज्या घरात चोरी करायची आहे, तिथं वेगवेगळ्या कामांसाठी या महिला काही दिवस अगोदर दाखल होत आणि चोरीसाठी सर्व तयारी करून ठेवत असत. चोरी झाल्यानंतर काही काळ तिथलं काम सुरू ठेऊन मग हळूच काढता पाय घेत असत. इरफानला हिऱ्यांची चांगली समज असून तो हिरे आणि दागिन्यांची सराईतपणे चोरी करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या इरफानसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.