Home /News /national /

2 मुलं असून वडिलांना म्हातारपणात सोडलं निराधार; प्रॉपर्टी देताना बाबांनीही दाखवला इंगा

2 मुलं असून वडिलांना म्हातारपणात सोडलं निराधार; प्रॉपर्टी देताना बाबांनीही दाखवला इंगा

अनेकदा मुलांना आई-वडिलांची संपत्ती हवी असते, मात्र त्यांचा सांभाळ करण्याची तयारी नसते. अशावेळी आई-वडिलांनीही सुज्ञ होणं गरजेचं आहे.

    आग्रा, 27 नोव्हेंबर : ताजनगरी आग्रामध्ये (Agra) 88 वर्षीय वयस्क गणेश शंकर यांची संपूर्ण शहरात चर्चा आहे. या व्यक्तीला त्यांच्या मुलांनी आधार दिला नाही, तर त्यांनी आपली संपत्ती त्यांना देण्यास नकार दिला. यानंतर व्यक्तीने आपल्या संपत्तीतील एकही रुपया मुलांना न देता डीएम (DM) च्या नावावर संपत्ती केली. त्यांनी (Property) संपत्तीची रजिस्टर्ड वारसा मॅजिस्ट्रेटच्या नावे केली आहे. त्या वयस्क व्यक्तीने सांगितलं की, जर म्हातारपणात मुलं त्यांची काळजी घेत नसतील तर त्यांना संपत्तीचा एकही भाग देणार नाही. सांगितलं जात आहे की, त्यांच्या संपत्तीची एकूण रक्कम 3 कोटी इतकी आहे. ही घटना छत्ता निरालाबाद पीपल मंडी येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शंकर पांडे यांनी आपला भाऊ नरेश शंकर पांडे, रघुनाथ आणि अजय शकंर यांच्यासह मिळून 1983 मध्ये मोठी जमिन खरेदी करून घर बांधलं होतं. घराची किंमत साधारण 13 कोटीपर्यंत आहे. वेळेनुसार चारही भावांनी घर वाटून घेतलं. सध्या गणेश शंकर यांच्या मालकीचा एक चतृथांश इतकी संपत्ती आहे. ज्याची किंमत साधारण 3 कोटी रुपये आहे. हे ही वाचा-डिप्रेशनने धारण केलं भयानक रूप; पोटच्या 2 मुलांसह 5 जणांची हत्या, अनेकांवर हल्ला भावांनी दिला आधार.. गणेश शंकर यांनी सांगितलं की, त्यांना दोन मुलं आहे. जे घरात राहूनचं त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यांनी दोन वेळेसच्या जेवणासाठीही भावांवर अवलंबून राहावं लागतं. मुलांना याबाबत सांगितलं की, त्यांनी वडिलांसोबत नातं तोडलं. यानंतर त्यांनी आपली सर्व संपत्ती आग्रातील डीएमच्या नावावर केली. सध्या ते त्यांच्या भावासोबत राहतात आणि एकाच घरात राहत असताना मुलांपासून लांब आहेत. सिटी मॅजिस्ट्रेटला रजिस्ट्री सोपवली.. गणेश शंकर यांनी ऑगस्ट 2018 मध्ये डीएम आग्राच्या नावावर घराची संपत्ती सोपवली होती. आता कलेक्ट्रेटला जाऊन त्यांनी सिटी मॅजिस्ट्रेट प्रतिपाल चौहान यांना रजिस्ट्री सोपवली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Agra, Father, Property issue

    पुढील बातम्या