त्रिपुरा 27 नोव्हेंबर : त्रिपुराच्या खोवाई इथे मानसिक रुग्ण असलेल्या एका व्यक्तीने आधी आपल्या दोन मुलांची धारदार हत्याराने हत्या केली (Man Killed his 2 Sons). यानंतर तो घरातून बाहेर गेला. परिसरातील प्रत्येक घरात जात तो हल्ला करू लागला. यादरम्यान त्याने एका रिक्षामध्ये बसलेल्या दोघांवर हल्ला केला. तोपर्यंत बरेच पोलीस तिथे पोहोचले होते. अशात खोवाई ठाण्याचे सेकंड इन्सपेक्टर सत्यजीत मलिक आरोपी प्रदीप देवराय याला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळा आरोपीनं मलिक यांनाही गंभीर जखमी केलं. नंतर त्यांचाही मृत्यू झाला. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलीस ठाण्यात नेलं (Man Killed 5 People due to Depression).
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप देवराय गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होता आणि त्यानी सर्वांशी बोलणंही बंद केलं होतं. काल मध्यरात्री अचानक झोपेतून उठून त्याने घरात ठेवलेली कुऱ्हाड घेऊन आधी आपल्या दोन मुलांना मारायला सुरुवात केली. यादरम्यान त्याने पत्नीलाही मारहाण केली. पत्नीने त्याला जखमी करून स्वतःचा बचाव केली. मात्र, तरीही ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तो घरातून बाहेर पडून परिसरातील इतर घरांवर हल्ले करू लागला. लोक इतके घाबरले होते की काही वेळ कोणीही घराबाहेर पडलं नाही.
त्यानंतर सर्वांनी हिंमत एकवटून एकत्र येत प्रदीपला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान प्रदीप हा वस्तीच्या चौकात आला. याठिकाणी एक ऑटोरिक्षा येत होती, त्यात बसलेल्या दोघांवर त्याने शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कृष्णा दास यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा करणबीर दास गंभीर जखमी झाला. यानंतर प्रदीपच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक सत्यजित मलिक यांनाही जीव गमवावा लागला.
प्रदीपने केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रदीपच्या या रक्तरंजित हिंसक वर्तनामागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Depression, Murder news