जाहिरात
मराठी बातम्या / देश / स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 18 जणांचा जागीच मृत्यू

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 18 जणांचा जागीच मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Terrible Road Accident: मृतदेह घेऊन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाने घाला घातला आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा जागीच मृत्यू (18 people death) झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नदिया, 28 नोव्हेंबर: मृतदेह घेऊन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाने घाला घातला आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात (Terrible Road accidet) 18 जणांचा जागीच मृत्यू (18 people death) झाला आहे. तर अन्य पाच जण गंभीर जखमी (5 injured) झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश उडाला होता. अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नातेवाईकांवरच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर 24 परगनाच्या बगदा येथील जवळपास 30 जण एका खाजगी वाहनाने नवद्विप स्मशानभूमीकडे जात होते. दरम्यान, नदिया जिल्ह्याच्या हंसखाली येथील फुलबाडी संबंधित वाहनाला भीषण अपघात झाला आहे. नातेवाईकाच्या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला जोरदार धडक मारली आहे. या अपघातात 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हेही वाचा- पुतण्या पेटवून घेत होता अन् चुलता पाहतच राहिला; धक्कादायक घटनेनं जालना हादरलं! जखमी नातेवाईंकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील दाट धुकं आणि वाहनाचा वेग अधिक असल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेची  नोंद केली असून घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. हेही वाचा- हात बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावून कापला गळा; नागपुरात महिला डॉक्टरची हत्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात उपस्थित सर्व लोक अंत्यसंस्कारासाठी नवद्विप स्मशानभूमीकडे जात होते. दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला या वाहनानं जोरदार  धडक दिली आहे. या वाहनात जवळपास तीस लोक होती, त्यातील 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात