जालना, 28 नोव्हेंबर: जालना (Jalna) जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील वाई याठिकाणी एका तरुणानं अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची (Young man set himself on fire) घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून (Dispute over land) चुलत्याने आणि त्यांच्या मुलांनी मारहाण केल्यानंतर (Uncle beat nephew) तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. संबंधित पेटवून घेतलेल्या तरुणाला आधी जालना आणि नंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या पत्नीनं दिलेल्या फिर्यादीवरून चुलत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चुलत्याला अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास परतूर पोलीस करत आहेत.
दीपक पांडुरंग घाडगे असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर चुलता मुक्तीराम घाडगे, अभिजित घाडगे, मीना घाडगे, अर्जुन येवले, परमेश्वर येवले या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी आणि मृत तरुण परतूर तालुक्यातील वाई येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाई येथील अंगणवाडी शेड असलेल्या जमिनीच्या तुकड्यावरून पुतण्या दीपक पांडुरंग घाडगे आणि चुलता मुक्तीराम नानाभाऊ घाडगे यांच्यात वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून धुसपूस सुरू होती.
हेही वाचा-पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग
दरम्यान, शुक्रवार दुपारी चारच्या सुमारास पुतण्या दीपक आणि चुलता मुक्तीराम यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी आरोपी चुलता आणि त्याची मुलं अशा सहा जणांनी मिळून दीपकला बेदम मारहाण केली. यामुळे संतापलेला पुतण्या दीपक याने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून सर्वांसमोर स्वत:ला पेटवून घेतलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
हेही वाचा-पत्नी 'हनी' आणि नवऱ्याने केलं ट्रॅप; कोल्हापुरातील व्यावसायिकाला लाखोंचा गंडा
मृत दीपक स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत असताना, उपस्थित लोकांपैकी कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दीपकला आधी जालना आणि मग औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण शनिवारी उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दीपकची पत्नी सपना घाडगे यांच्या फिर्यादीनुसार, सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुख्य संशयित आरोपी चुलत्याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news