मराठी बातम्या /बातम्या /देश /

16 वर्षीय युवकाची धावत्या ट्रेनसमोर उडी; सुसाइड नोटमधून PM मोदींकडे अखेरची मागणी

16 वर्षीय युवकाची धावत्या ट्रेनसमोर उडी; सुसाइड नोटमधून PM मोदींकडे अखेरची मागणी

Suicide News: अकरावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय युवकाने रविवारी रात्री धावत्या रेल्वेसमोर उडी घेत त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

Suicide News: अकरावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय युवकाने रविवारी रात्री धावत्या रेल्वेसमोर उडी घेत त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

Suicide News: अकरावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय युवकाने रविवारी रात्री धावत्या रेल्वेसमोर उडी घेत त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

  • Published by:  News18 Desk

ग्वालियर, 12 ऑक्टोबर: प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना, काहीतरी स्वप्न उराशी बाळगून आपल्या आयुष्याचा प्रवास करत असतो. काहींची स्वप्न पूर्ण होतात. पण बरेच प्रयत्न करूनही काहींची स्वप्न अधुरी राहतात. स्वप्न पूर्ण न झाल्याने अनेकजण नैराश्यात जाऊन नको ते पाऊल उचलतात, अशीच एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. डान्सर बनण्याचं स्वप्न पूर्ण न झाल्याने अकरावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या (Suicide by jumping in front of running train) केली आहे. यावेळी तरुणाच्या खिशात सुसाइड नोट (Suicide note) सापडली असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे अखेरची इच्छा व्यक्त केली आहे.

संबंधित आत्महत्या करणारा तरुण ग्वालियर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल परिसरातील रहिवासी असून तो इयत्ता अकरावीत शिकत होता. दरम्यान रविवारी रात्री एका धावत्या रेल्वेसमोर उडी घेत त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अशा पद्धतीनं अचानक मुलानं आत्महत्या केल्यानं कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. यावेळी मृत तरुणाच्या खिशात सुसाइड नोट आढळली आहे. सुसाइड नोटमध्ये तरुणानं आत्महत्येच्या कारणाचा खुलासा केला आहे. तसेच PM मोदींना उद्देशून अखेरची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा-जळगावात विद्यार्थिनीची आत्महत्या; मोबाईलमधील स्क्रीनशॉटमुळे वाढलं गूढ

एक चांगला डान्सर होऊ न शकल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. तसेच डान्सर बनण्याचं स्वप्न असताना कुटुंबीयांनी आणि मित्रांनी आपल्याला योग्य साथ दिली नाही, असंही त्याने म्हटलं आहे. तसेच माझ्या मृत्यूनंतर माझ्यावर अधारित एक म्युझिक व्हिडीओ तयार करण्यात यावा. संबंधित गाणं प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरजित सिंग (Arjit Singh) यांनी स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करावं.

हेही वाचा-मुंबईत विधवा महिलेस फसवलं; मुलींचं शिक्षण अन् लग्नासाठी ठेवलेले 32 लाख हडपले

तसेच या म्युझिक व्हिडीओसाठी जो डान्स असेल, तो डान्स नेपाळी कलाकार सुशांत खत्री (Shushant Khatri) यांनी कोरियोग्राफ करावा, अशी अखेरची इच्छा तरुणानं व्यक्त केली आहे. तसेच माझा सरकारवर पूर्ण विश्वास असून नरेंद्र मोदी माझी शेवटची इच्छा पूर्ण करतील. हा म्युझिक व्हिडीओ माझ्या आत्म्याला शांती देईल. असंही त्याने सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, Suicide