जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत निराधार विधवा महिलेस फसवलं; मुलींचं शिक्षण अन् लग्नासाठी ठेवलेले 32 लाख हडपले

मुंबईत निराधार विधवा महिलेस फसवलं; मुलींचं शिक्षण अन् लग्नासाठी ठेवलेले 32 लाख हडपले

मुंबईत निराधार विधवा महिलेस फसवलं; मुलींचं शिक्षण अन् लग्नासाठी ठेवलेले 32 लाख हडपले

Crime in Mumbai: मुंबईनजीक असणाऱ्या मीरारोड येथील एका विधवा महिलेनं आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी बचत करून ठेवलेले पैसे एका ओळखीतील व्यक्तीने हडपले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मीरारोड, 12 ऑक्टोबर: मुंबईनजीक असणाऱ्या मीरारोड येथील एका विधवा महिलेनं आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी बचत करून ठेवलेले पैसे एका ओळखीतील व्यक्तीने हडपले (money fraud with widow woman) आहेत. आरोपीनं म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक (Fraud under investment in mutual fund) करण्याच्या नावाखाली निराधार विधवा महिलेची फसवणूक केली आहे. आरोपीनं पीडितेला तब्बल 32 लाख 46 हजार रुपयांना गंडा (Rs 32 lakh fraud) घातला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं मीरारोड येथील नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मातेश्वर राजपत गिरी असं गुन्हा दाखल झालेल्या 40 वर्षीय आरोपीचं नाव असून तो वांद्रे येथील एमआयजी कॉलनीतील रहिवासी आहे. आरोपी मातेश्वर हा फिर्यादी महिलेच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. तर सावित्री कोयारी असं फिर्यादी महिलेचं नाव असून त्या मीरारोड परिसरातील रहिवासी आहेत. आरोपीनं फिर्यादीकडून म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली 51 लाख 50 हजार रुपये घेतले होते. पण आरोपीनं गुंतवणूक केल्याचे कोणतीच कागदपत्रे फिर्यादीला दिली नव्हती. हेही वाचा- ड्रोनच्या मदतीनं लावला ‘त्या’ सोनसाखळी चोराचा छडा, गोळीबारात संशयित ठार दरम्यान, फिर्यादी सावित्री यांनी गुंतवणूक केलेली रक्कम आरोपीकडे मागितली पण आरोपीनं टोलवाटोलवी करायला सुरुवात केली. फिर्यादीनं पैशांसाठी तगादा लावल्यानंतर आरोपीनं थोडी थोडी करत काही रक्कम परत दिली. पण उर्वरित 32 लाख 46 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेनं नया नगर पोलीस ठाण्यात आरोपी मातेश्वर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा- पांढराशुभ्र शर्ट घालून ऐटीत कारमधून उतरायचे अन्.., मंगळसूत्र चोरणारी टोळी गजाआड मीरारोड येथील रहिवासी असणाऱ्या फिर्यादी सावित्री कोयारी यांचे पती आणि भाऊ यांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे पतीच्या विम्याचे पैसे सावित्री यांना मिळाले होते. या रकमेतून त्यांनी काही मालमत्ता खरेदी केली होती. तर 2018 साली आरोपी मातेश्वर याने आपण म्युचुअल फंडात काम करत असल्याचं सांगत, येथे गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असं आमिष दाखवलं. पीडितेनं आरोपीवर विश्वास ठेवून 51 लाख रुपयांची रक्कम आरोपीला चेक आणि एनएफटीद्वारे दिली होती. पण आरोपीनं त्यांची फसवणूक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात