मराठी बातम्या /बातम्या /देश /

Republic Day Violence: आतापर्यंत 15 FIR दाखल; पंजाबच्या गँगस्टर लक्खाचं नाव समोर

Republic Day Violence: आतापर्यंत 15 FIR दाखल; पंजाबच्या गँगस्टर लक्खाचं नाव समोर

लक्खा सिदाना आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून दिल्ली पोलिसांवर हल्ल्याची भूमिका समोर आली आहे. लक्खा सिदनावर पंजाबमध्ये 24 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 27 जानेवारी : दिल्लीच्या रस्त्यांवर 26 जानेवारी, प्रजासत्ताकदिनी (Republic Day) झालेल्या हिंसेनंतर सर्वत्र टीका होते आहे. किसान ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (Farmers Tractor Rally) झालेल्या हिंसेत दिल्ली पोलिसांना निशाणा करण्यात आलं. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी या हिंसेबाबतचा तपास अधिक जलद केला आहे. दिल्ली पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल दिल्लीत झालेल्या हिंसेत गँगस्टर आणि एक्टिव्हिस्ट लक्खा सिदानाच्या भूमिकेबाबत तपास केला जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्खा सिदाना आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून दिल्ली पोलिसांवर हल्ल्याची भूमिका समोर आली आहे. लक्खा सिदनावर पंजाबमध्ये 24 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यात गँगस्टर ऍक्टही सामिल आहे. सिदना शेतकरी आंदोलनात अनेक दिवसांपासून सामिल आहे. पोलीस आता त्याच्या भूमिकेबाबत तपास करत आहे.

(वाचा - Red Fort वर पोलीस व जवानांवर भीषण हल्ल्याचा Live Video; बचावासाठी टाकल्या उड्या)

दिल्ली पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर आतापर्यंत 153 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी आतापर्यंत 15 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यात पूर्व दिल्ली, द्वारका आणि पश्चिम दिल्लीमध्ये 3-3 एफआयआर, 2 आउटर नॉर्थ, एक शाहदरा आणि एक नॉर्थ जिल्ह्यात एफआयआर दाखल झाल्या आहेत.

(वाचा - दगडफेक, लाठीमार, पोलिसांवर हल्ला; दिल्लीच्या आंदोलनाचे 5 धक्कादायक VIDEO)

दिल्लीच्या 6 जिल्ह्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सरकारी संपत्तीचं नुकसान, बंडखोरी, शस्त्रांत्रांचा समावेश असे कलम सामिल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात 8 DTC बस, 17 पब्लिक व्हिकल, 4 कंटेनर, 300 हून अधिक लोखंडी बॅरीकेड्स तोडले आहेत. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास गेल्या 60 दिवसांहून अधिक शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला.
First published:

Tags: Farmer protest

पुढील बातम्या