नवी दिल्ली 26 जानेवारी : कृषी कायद्यांविरोधात आज आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीला आक्रमक रुप आल्याचे पाहायला मिळाले. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवरच हल्ला केल्याच्या काही घटना या रॅलीदरम्यान पाहायला मिळाल्या. या रॅलीदरम्यान झालेल्या 5 धक्कादायक घटनांचे व्हिडिओ पाहूया.
चिल्ला बॉर्डरवर ट्रॅक्टर परेडआधी काही शेतकरी स्टंट करत होते. त्यावेळी ट्रॅक्टर पलटल्यामुळे एक शेतकरी जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला. पाहा नेमकं काय घडलं.
दिल्लीच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला.
दिल्लीत शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. त्याच वेळी हा एक VIDEO व्हायरल झाला आहे. काही जण हातात लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले आहेत आणि कडेने जाणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला काठ्यांनी मारत असल्याचं यात दिसतं. महिला पोलीस कर्मचारीही त्या पोलिसांबरोबर दिसत आहे. pic.twitter.com/NmoJ1nCfyI
— News18Lokmat (@News18lokmat) January 26, 2021
ट्रॅक्टर रॅलीदरम्यान एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. यामध्ये काही जण हातात लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले आहेत आणि कडेने जाणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला काठ्यांनी मारत असल्याचं यात दिसतं. महिला पोलीस कर्मचारीही त्या पोलिसांबरोबर दिसत आहे.
या आंदोलनादरम्यानचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
धक्कादायक VIDEO: आंदोलकांची लाल किल्ल्यावर चढाई. घुमटांवर फडकावला ध्वज#FarmersProtest pic.twitter.com/WVhneuln7e
— News18Lokmat (@News18lokmat) January 26, 2021
दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त लावून सुद्धा शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन लालकिल्ल्यावर धडकले आहे. लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. त्यानंतर संतप्त झालेला जमाव हा लाल किल्ल्यात घुसला आणि जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. काही वेळानंतर शेतकरी आंदोलकांनी किल्ल्याच्या घुमटावर आंदोलनाचा झेंडा फडकावला. हा व्हिडीओ समोर आला आहे.