जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! 13 वर्षीय मुलीनं बाळाला दिला जन्म; वर्गमित्रानं ब्लॅकमेल करत केला होता बलात्कार

धक्कादायक! 13 वर्षीय मुलीनं बाळाला दिला जन्म; वर्गमित्रानं ब्लॅकमेल करत केला होता बलात्कार

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उल्हासनगरमध्ये 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rape On Minor Girl: एका 13 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म (13 Years old girl give birth) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं ब्लॅकमेल करत पीडितेवर अनेकदा बलात्कार केला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नदिया, 07 जुलै: एका 13 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म (13 Years old girl give birth) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातवीत शिकणाऱ्या पीडित मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलानं ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार (Minor classmate blackmail and raped) केला होता. यातूनच तिनं या बाळाला जन्म दिला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पीडितेच्या आईनं पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR Lodged) केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच अल्पवयीन आरोपीनं बांगलादेशात पलायन केलं आहे. याठिकाणी आरोपीचा आजोबा राहतो. संबंधित घटना पश्चिम बंगाल राज्याच्या नदिया येथील आहे. नदिया कार्यक्षेत्रात येणाऱ्या धनताला पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन आरोपी आपल्या परिवारासह बांगलादेशात पळाला आहे. त्यामुळे पोलीस त्याला परत आणण्याची तयारी करत आहेत. हेही वाचा- रक्षकच ठरला भक्षक! मदतीचं सोंग करत हतबल महिलेवर पोलिसाचा 19 दिवस बलात्कार संबंधित अल्पवयीन आरोपीनं काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची छेड काढली होती. तिच्याशी शारीरिक गैरवर्तन करत आरोपीनं काही फोटो काढले होते. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं तिच्यावर अनेकदा बलात्कार केला होता. आपल्यासोबत घडणाऱ्या अत्याचाराची माहिती घरच्यांना दिली, बदनामी होईल. या भीतीनं सातवीत शिकणारी पीडिता आरोपीचा अत्याचार निमूटपणे सहन करत होती. हेही वाचा- लॉकडाऊनमध्ये घरबसल्या नको ते उद्योग;आता बॉसची भीती दाखवून प्रेयसी करते BlackMail 13 वर्षीय पीडित मुलीनं बाळाला जन्म दिल्यानं पीडितेची आईची घाबरून अवस्था वाईट झाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईनं धनताला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पण आरोपी दुसऱ्या देशात फरार झाल्यानं पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोपीवर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात