Home /News /crime /

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या केले नको ते उद्योग; आता बॉसची भीती दाखवून प्रेयसी करते BlackMail

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या केले नको ते उद्योग; आता बॉसची भीती दाखवून प्रेयसी करते BlackMail

मात्र सर्वांनाच खरं प्रेम मिळतच असं नाही. काहींना तर प्रेमात धोकाही खावा लागतो.

    लंडन, 5 जुलै : प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्यांवर जगात अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. प्रेमावर तर कविता, गीत आणि कादंबऱ्याही लिहिण्यात आल्या आहेत. त्यातही Love at first sight बद्दल तर काही विचारू नका. मात्र सर्वांनाच खरं प्रेम मिळतचं असं नाही. काहींना तर प्रेमात धोकाही खावा लागतो. बरं ही वेळ कोणाच्याही आयुष्यात कधीही येऊ शकते. अनेकदा परिस्थिती इतकी बिकट होते की नेमकं काय करावं, हे कळतदेखील नाही. (Lover uploads private videos to gay sites during lockdown now girlfriend threatened to send video to boss) गे साइटवर शेअर केला व्हिडीओ द सनमध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार हैराण करणारं हे वृत्त ब्रिटेनमध्ये घडलं आहे. येथे एका प्रियकराने लॉकडाऊनदरम्यान (Lockdown) आपले काही व्हिडीओ गे साइटवर अपलोड केले होते. लॉकडाऊनमध्ये घरातच असल्या कारणाने त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं. मात्र एके दिवशी त्याच्या प्रेयसीने ते व्हिडीओ पाहिले आणि तिने ते व्हिडीओ रेकॉर्ड केले. आता प्रेयसी ते व्हिडीओ तरुणाच्या बॉसला पाठविण्याची धमकी देत आहे. त्रस्त झालेल्या प्रियकराने जेव्हा याबाबत एका कन्स्ल्टंटकडे मदत मागितली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. दिलेल्या वृत्तानुसार, प्रियकर म्हणाला की, मी 26 वर्षांचा आहे आणि माझी प्रेयसी 24 वर्षांची. जेव्हा तिने पहिल्यांदा माझे व्हिडीओ पाहिले तेव्हा ती चिडली होती. मी ते साइटवरुन हटविण्याआधीच तिने सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतले आणि आपल्या भावांना पाठवले. मी या कृत्यासाठी तिची माफीदेखील मागितली. हे ही वाचा-VIDEO : क्षुल्लक कारणावरुन आर्मीचा जवान भडकला; रागाच्या भरात एकाचा जीवच घेतला आता सल्लागाराने प्रियकराला न घाबरता परिस्थितीशी दोन हात करण्याचा सल्ला दिला आहे. एक्सपर्ट म्हणाला की, तुमच्या प्रेयसीने (Girlfriend) परवानगीशिवाय व्हिडीओ शेअर केले होते. त्यामुळे यात तिचीच चूक आहे. हा कायदेशीर गुन्हा आहे. कोणाचेही खाजगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देणं गुन्हा आहे. त्यामुळे तुम्ही तिची समजूत काढा. जर ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती भविष्यात तुला त्रास होईल असं वागणार नाही. त्यामुळे शेवटी त्याने तिच्यासोबतचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Britain, Crime news

    पुढील बातम्या