जाहिरात
मराठी बातम्या / देश / प्रतीक्षा संपली! Army युनिट्सच्या इतिहासात महिलांना पहिल्यांदाच मिळणार 'ही' संधी

प्रतीक्षा संपली! Army युनिट्सच्या इतिहासात महिलांना पहिल्यांदाच मिळणार 'ही' संधी

प्रतीक्षा संपली! Army युनिट्सच्या इतिहासात महिलांना पहिल्यांदाच मिळणार 'ही' संधी

भारतीय संरक्षण दलाचा जगात चौथा क्रमांक लागतो. भारतीय सैन्य दलाच्या इतिहासातील एका ऐतिहासिक बदलाला आता सुरूवात झाली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 20 जानेवारी :  भारतीय संरक्षण दलाचा जगात चौथा क्रमांक लागतो. संरक्षण दलाचे भूदल, वायूदल आणि नौदल असे तीन मुख्य प्रकार पडतात. भारतीय सैन्य दलांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचाही उल्लेखनीय सहभाग आहे. भूदलाचा (आर्मी) विचार केला तर, आतापर्यंत जवळपास 108 महिला अधिकाऱ्यांना कर्नल (सिलेक्शन ग्रेड) पदासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना प्रथमच त्यांच्या संबंधित शस्त्रास्त्रं आणि सेवा युनिट्सचं नेतृत्त्व करता येणार आहे. ‘द वुमन ऑफिसर्स स्पेशल नंबर 3’ निवड मंडळाची कार्यवाही 9 जानेवारीपासून लष्कराच्या मुख्यालयात सुरू झालेली आहे. महिलांना पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीनं संधी देण्यासाठी त्यांची लेफ्टनंट कर्नल पदावरून कर्नल पदावर पदोन्नती केली जात आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय आहे निर्णय? विविध शस्त्रास्त्र आणि सेवा युनिटमधील 108 रिक्त पदांसाठी 1992 ते 2006 च्या बॅचमधील 244 महिला अधिकार्‍यांचा पदोन्नतीसाठी विचार केला जात आहे. यामध्ये इंजिनीअर्स, सिग्नल्स, आर्मी एअर डिफेन्स, इंटिलिजन्स कॉर्प्स, आर्मी सर्व्हिस कॉर्प्स, आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनीअर्स विभागांचा समावेश आहे. देशाला मिळणार पहिले समलैंगिक न्यायाधीश? केंद्र सरकारच्या आक्षेपानंतरही पुन्हा शिफारस ‘इंडियन एक्सप्रेस’नं संरक्षण सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, सर्व शस्त्रास्त्रे आणि सेवा युनिट्सपैकी इंजिनीअर्स कॉर्प्समध्ये सर्वाधिक 28 जागा आहेत, ज्यासाठी 65 महिला अधिकाऱ्यांचा विचार केला जात आहे. त्यानंतर आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रत्येकी 19 आणि 21 जागा आहेत. त्यासाठी प्रत्येकी 47 महिला अधिकाऱ्यांचा कर्नल पदासाठी विचार केला जात आहे. आर्मी एअर डिफेन्समधील तीन रिक्त पदांवर पदोन्नती देण्यासाठी सात महिला अधिकार्‍यांचा विचार केला जात आहे आणि इंटिलिजेंस कॉर्प्समधील पाच रिक्त पदांवर पदोन्नती देण्यासाठी सात महिला अधिकार्‍यांचं मूल्यांकन केलं जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं. आर्मी सर्व्हिस कॉर्प्स आणि कॉर्प्स ऑफ सिग्नल्ससाठी अनुक्रमे 14 आणि 18 रिक्त पदांवर 29 आणि 42 महिला अधिकाऱ्यांचं पदोन्नतीसाठी मूल्यांकन केलं जात आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यानं सांगितलं की, हे पाऊल उचलण्यास उशीर झाला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे. याचा मला आनंद आहे. त्या म्हणाल्या, “उशिरा का होईना, आमच्या कठोर परिश्रमाचं आणि चिकाटीचं फळ मिळत आहे. हे पाहून आनंद होतं आहे. आजच्या दिवसाची अनेकजणी वाट बघत होत्या.” 1992 च्या बॅचपासून सुरू होणार्‍या प्रत्येक बॅचसाठी दररोज प्रमोशन बोर्डाच्या बैठकीचं आयोजन केलं जात आहे आणि निकालही लगेच जाहीर केले जात आहेत. एका लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलं की, प्रत्येक अधिकाऱ्याला पदोन्नतीसाठी तीन संधी मिळतात. “उदाहरणार्थ, जर 1995 च्या बॅचच्या अधिकाऱ्याला पहिल्या दिवशी या प्रक्रियेत यश मिळालं नाही तर तिचं दुसऱ्या दिवशी पदोन्नतीसाठी इतर बॅचसह पुन्हा मूल्यांकन केलं जातं,” अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली. देशासाठी जीव ओवाळून टाकायला सज्ज आहात? मग असे व्हा भारतीय सैन्यात भरती संरक्षण सूत्रांनी सांगितलं की, एकूण 60 महिला अधिकाऱ्यांना निवड मंडळासाठी निरीक्षक म्हणून बोलावण्यात आले आहे. जेणेकरून सर्व प्रक्रिया निष्पक्ष आणि निर्धोक आहे, याची खात्री होईल. निवड मंडळानं तंदुरुस्त म्हणून घोषित केलेल्या 108 महिला अधिकारी विविध कमांड असाइनमेंटसाठी विचाराधीन असतील. अशा पोस्टिंगचा पहिला सेट जानेवारीच्या अखेरीस जारी केला जाईल. “महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं, भारतीय लष्करानं महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीनं पर्मनंट कमिशन (पीसी) मंजूर केलं आहे,” असं एका सूत्रानं सांगितलं. महिला अधिकारी पीसी ग्रँटसह, उच्च पदं आणि जबाबदारी असलेल्या पुरुष सहकाऱ्यांप्रमाणेच आव्हानात्मक नेतृत्व स्वीकारण्याची तयारी करत आहेत. C-60 टीमचे जवान करणार भारत यात्रा, कारण समजल्यावर कराल सॅल्युट, Video सध्या,  सर्व महिला अधिकाऱ्यांना लष्करातील उच्च नेतृत्वाच्या भूमिकांसाठी सक्षम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि आव्हानात्मक लष्करी असाइनमेंट सुरू आहेत. ज्युनिअर बॅचमधील महिला अधिकाऱ्यांनाही पर्मनंट कमिशन देण्याचा विचार सुरू आहे. लष्करी सेवेच्या १० व्या वर्षात असलेल्या ज्युनिअर अधिकाऱ्यांचा यासाठी विचार केला जाणार आहे. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कोर्स (सीएसएससी) आणि डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स (डीएसटीएससी) या दरवर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत पहिल्यांदाच पाच महिला अधिकाऱ्यांनी यश मिळवलं आहे. त्या वर्षभर चालणारा एक अभ्यासक्रम पूर्ण करतील ज्यामुळे कमांड नियुक्तीसाठी विचार केला जात असताना त्यांना प्राधान्य मिळेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात