नागपूर, 17 जानेवारी : जिथे शत्रूंची ओळख पटणे हेच पाहिले आणि मोठे आव्हान आहे, अशा दुर्गम परिस्थितीत नक्षलग्रस्त भागात जवानांची C-60 ही विशेष तैनात तुकडी मोठ्या शौर्याने आणि धाडसाने देशाचे संरक्षण करते. या जवानांचे कार्य, त्यांचा पराक्रम आणि देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने C-60 मधील 5 जवान 4 मोटरसायकल वरून संपूर्ण देशभर विशेष मोहीम आखून यात्रा करत आहेत. ही यात्रा नागपुरात पोहचली असता स्वागत करण्यात आले.
भारताच्या रक्षणार्थ देशाच्या सीमेवर अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत कसलीही तमा न बाळगता हे जवान वेळप्रसंगी देशासाठी त्यागाची परिसीमा गाठत असतात. त्याचप्रमाणे ते देशाच्या अंतर्गत देखील कार्यरत असतात. अशाच अतिशय दुर्गम दंडकारण्यात स्थित असलेल्या गडचिरोली भामरागड सारख्या नक्षलग्रस्त भागात देखील हेच जवान देश विरोधी कारवाई उधळून लावत नक्षल्याच्या मुसक्या आवळत असतात.
जवानांच्या कार्याचा जागर
C-60 मधील 5 जवान 4 मोटरसायकल वरून संपूर्ण देशभर विशेष मोहीम आखून यात्रा करत आहेत. सर्वत्र त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले जात आहे. या प्रवासादरम्यान असताना या जवानांचे नुकतेच नागपुरात आगमन झाले. त्यावेळी त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले होते. तमाम भारतीयांमध्ये सैन्याविषयी कमालीचा आदर आणि अभिमान आहे. तो अधिक दृढ व्हावा आणि C-60 जवानांचे शौर्य देशभर पोहचावे या मोहिमेतील एक उद्देश आहे.
गडचिरोली भामरागड सारख्या नक्षलग्रस्त भागात C-60 कमांडोचे जवान कशाप्रकारे देश सेवेचे कार्य करत आहेत? देशातील या भागत काय घटना घडत आहेत ? C-60 जवानांचे काय योगदान आहे? तसेच देशासाठी शहीद झालेल्या C-60 जवानांचे शौर्य देशातील काना कोपऱ्यात माहिती व्हावे, या उद्देशाने या मोहिमेच्या आयोजन केले आहे.
45 हजार किमीचा प्रवास
ही मोहीम 4 टप्प्यात विभागली असून देशातील चारही टोक त्यात गुजरात मधील कोटेश्वर, पासून ते बंगालपर्यंत आणि काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत असा हा प्रवास समाविष्ट आहे. यातील पहिली मोहीम ही मागील वर्षी 27 दिवसांच्या प्रवासात उत्तर भारतातील 9000 किमी चा प्रवास पूर्ण केला आहे. आता 4 राज्यातून प्रवास करत 22 दिवसात 6500 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. येत्या काळात उर्वरित मोहीम पूर्ण केली जाणार आहे. यातील एकूण अंतर हे अंदाजे 45 हजार किमी असणार आहे.
विदर्भातील 'या' मंदिरात संध्याकाळनंतर कुणीच थांबत नाही! पाहा Video
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मान मिळावा
मोहिमेअंतर्गत आम्ही ठिकठिकाणी C-60 जवानांच्या कार्याचा जागर घालत ते करत असलेल्या कार्याची माहिती दिली. लोकांनी फार उत्साहात आमाचे स्वागत केले आहे. एक भारतीय जवान म्हणून आम्हाला जो सन्मान मिळाला त्याबद्दल आनंदी आहोत. मात्र तोच सन्मान आमच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या स्मृतींना देखील मिळावा त्याचे देशकार्य देशातील काना कोपऱ्यात पोहचले जावे, असा आमचा उद्देश आहे. या मोहिमेत आम्हाला आमच्या सर्व अधिकारी आणि सहकारी जवान मित्रांनी फार सहकार्य केलं असल्याचे C-60 कमांडो किशोर खोब्रागडे यांनी सांगितले.
क्या बात है! विद्यार्थ्यांनी तयार केलेली 150 सॅटेलाईट अवकाशात झेपवणार, Video
जवानांच्या पराक्रमाला स्मरून यात्रा
गडचिरोली भामरागड सारख्या नक्षलग्रस्त भागात C-60 चे जवान मोठ्या शौर्याने कार्य करत आहे. आजवर अनेक धाडसी मोहिमांमध्ये C-60 जवानांचे योगदान आहे. आजवरच्या एन्काऊंटर कारवायांमध्ये आम्ही देखील नक्षल्यांचा खात्मा केला असून दुर्दैवाने आमचे देखील जवान मित्र त्यात शहीद झाले आहेत. या जवानांच्या पराक्रमाला, त्यांच्या त्यागाला स्मरून आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही देशसेवेचे व्रत स्वीकारले आहे. आमच्या C-60 जवानांची शौर्य गाथा देशभर पोचवण्यासाठी व त्यांना सन्मान मिळवण्यासाठी आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात जाणार असल्याचे C-60 चे कमांडो अजिंक्य भुरे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Local18, Nagpur