जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / घरात भाऊ नसल्याचं पाहून साधला डाव; दीराने वहिनीची केलेली अवस्था पाहून हादराल!

घरात भाऊ नसल्याचं पाहून साधला डाव; दीराने वहिनीची केलेली अवस्था पाहून हादराल!

घरात भाऊ नसल्याचं पाहून साधला डाव; दीराने वहिनीची केलेली अवस्था पाहून हादराल!

इतकी क्रूरता येते कुठून? कोणी आपल्या वहिनीसोबत असं कसं करू शकेल…

  • -MIN READ
  • Last Updated :

बरेली, 19 सप्टेंबर : बरेलीमधील (Bareilly Crime News) सुभाष नगर पोलीस ठाणे हद्दीतील शांती विहार कॉलनीत गेल्या महिन्यात झालेल्या  विनीता हत्याकांडाचा (Murder) खुलासा करताना पोलिसांना महिलेच्या दीराला अटक केली आहे. आरोपी दीराने या प्रकरणात धक्कादायक माहिती सांगितली आहे. अवैध संबंध ठेवण्यासाठी वहिनीने नकार दिला होता, त्यामुळे दगडाने ठेचून तिची हत्या केली. घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यावेळी विनीताच्या 6 वर्षांच्या मुलीने आपल्या काकाने हत्या केल्याचा आरोप केला होता. जेव्हा आकाशने वहिनीची हत्या केली त्यावेळी 6 वर्षांची मुलगी देखील तेथेच होती. मुलीने पोलीस आणि आजीला काकाने केलेलं कृत्य सांगितलं. (sister in law had refused to have an illicit affair so brother in law killed her) घटनेनंतर विनीताच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तोपर्यंत आरोपी आकाश फरार झाला होता. अखेर त्याला शोधण्यात पोलिसांना यश आलं असून शेवटी त्याने वहिनीची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. आरोपीने सांगितलं की, ऑगस्ट महिन्यात त्याचा भाऊ नोकरीसाठी हरियाणाला गेला होता. त्यावेळी त्याने वहिनी एकटी असल्याचं पाहून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र विनीताने त्याला विरोध केला. विनीताने विरोध केल्यामुळे रागाच्या भरात आकाशने दगडाने ठेवून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरुन फरार झाला. हे ही वाचा- लेकीच्या अपहरणाची खोटी तक्रार; पोलिसांकडून हैराण करणारा खुलासा या प्रकरणात एसपी सिटी रविंद्र कुमार यांनी सांगितलं की, गेल्या महिन्यात शांती विहार कॉलनीत एका महिलेची हत्या करण्यात आली होती. ज्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप करीत गुन्हा दाखल केला होता. आज या हत्याकांडाचा खुलासा करीत महिलेचा दीर आकाश याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला कडक शिक्षा मिळावी यासाठीही प्रयत्न केले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात