4 दिवसांपूर्वीच दोन भावांचा अपघातात मृत्यू; राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा गेला दोघांचा जीव

4 दिवसांपूर्वीच दोन भावांचा अपघातात मृत्यू; राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा गेला दोघांचा जीव

राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे.

  • Share this:

भुसावळ, 20 जून : भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भुसावळमधील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. माळी भवनाजवळील उड्डाणपुलावर  रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. दरम्यान, महामार्गावर अपघातांचे सत्र कायम असून चार दिवसांपूर्वीच भुसावळातील सिंधी कॉलनीतील भावंडाचा साकेगावजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच पुन्हा अपघात झाल्याने ग्रीन पार्क भागात शोककळा पसरली. अपघातातील मयत रेल्वेत गँगमन असल्याचे समजते.

भुसावळातील दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू

समजलेल्या माहितीनुसार, साकेगावकडून भुसावळच्या दिशेने भुसावळातील तरुण दुचाकीवरुन येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अल्ताउद्दीन बशिरोद्दीन शेख (24) व शेख शरीफ शेख इद्रीस (25, दोन्ही रा.ग्रीन पार्क, भुसावळ) या तरुणांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने इतकी जोरदार धडक दिली की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला.

हे ही वाचा-नाशकात फिरायला जात असाल तर खबरदार; 44 जणांवर कारवाई, गुन्हे दाखल करण्याचा आदेश

अपघातामुळे वाहतूक ठप्प

माळी भवनापासून काही अंतरावर उड्डापणपुलावर रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, सहा.हरीष भोये, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक अनिल मोरे, रवींद्र बिर्‍हाडे, आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली

Published by: Meenal Gangurde
First published: June 20, 2021, 11:12 PM IST

ताज्या बातम्या