लुधियाना, 16 ऑगस्ट : लुधियानामधून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. आज सकाळी एका व्यावसायिकेने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता राजीव एन्क्लेवजवळी एका व्यक्तीच्या हत्येची (Murder) घटना उघडकीस आली आहे. या मृत तरुणाचं नाव सपन कुमार शाह असून तो 28 वर्षांचा होता. सपन हा जहीरपूर रोड जवळ राहत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून कारवाई सुरू केली आहे. (Crime news)
पोलिसांनी सांगितलं की, मृत सपनचे आपल्या मामीसोबत अवैध संबंध होते, ज्यामुळे मामाने त्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सपन एका भट्टीवर काम करीत होता. सपन आपल्या मामासोबत राहत होता. 3 महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं, आणि काही दिवसांपूवीच तो मामाकडे राहायला आला होता.
कशी केली हत्या..
बऱ्याच दिवसांपासून सपन कामावर येत नसल्यामुळे भट्टीच्या मालकाने अनेकदा त्याला फोन केले, मात्र तो फोन उचलत नव्हता. शेवटी मालकाने सपनसोबत काम करणाऱ्या व्यक्तीला त्याला आणण्यास सांगितलं. जेव्हा सिद्धू नावाची व्यक्ती मामाच्या घरी पोहोचली तेव्हा मामाने त्याला पळवून लावलं आणि सपनला भेटू दिलं नाही.
हे ही वाचा-Rape & Murder : चितेजवळ मिळालेल्या पुराव्यांमुळे पुजाऱ्याचं घृणास्पद कृत्य उघड
त्यानंतर सायंकाळी तो पुन्हा आला. दार उघडताच मामाने सांगितलं की त्याचा मृत्यू झाला आहे. जेव्हा त्याने आत येऊन मृतदेह पाहिला तर त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली होती. त्याने तातडीने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला तेव्हा मिळालेली माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला. सपन याचं त्याच्या मामीसोबत अवैध संबंध होते. यात मामने त्याची हत्या केली. सध्या मामाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.