घरात सुख शांतीसाठी ठेवली पूजा, भोंदूबाबाने पतीला बाहेर पाठवून गायिकेवर केला बलात्कार

घरात सुख शांतीसाठी ठेवली पूजा, भोंदूबाबाने पतीला बाहेर पाठवून गायिकेवर केला बलात्कार

घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी या करिता तिने आणि तिच्या पतीने घरात पूजापाठ करण्याचं ठरवलं होतं

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील चारकोपमध्ये घरात समृद्धी आणि व्यवसायवृद्धीसाठी  घरात पूजा करण्याच्या बहाण्याने 24 वर्षीय गायिकेवर भोंदू बाबाने बलात्कार केल्याची  धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसानी उमेश रमाशंकर पांडे या भोंदू बाबाला अटक केली आहे.

पीडित महिला ही गायिका आहे. तीने काही रिमिक्स अल्बममध्ये गाणं गायलं आहे. ती आपल्या पतीसह कांदिवली पश्चिम परिसरातील चारकोपमध्ये राहते.

घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी या करिता तिने आणि तिच्या पतीने घरात पूजापाठ करण्याचं ठरवलं होतं. यासाठी शेजारीच राहत असलेल्या आरोपी भोंदूबाबा उमेश पांडेकडून पूजा पाठ करण्याचे नियोजन केलं होतं. आरोपी उमेश पांडे हा गेल्या वर्षभरापासून त्यांच्या ओळखीतला होता.

सोमवारी दिनांक 20 जानेवारी रोजी ठरल्याप्रमाणे घरात पूजा करण्यात आली. पूजापाठ झाल्यानंतर भोंदूबाबा उमेश पांडेनं पीडितेच्या पतीला घराबाहेर जाण्याचं सांगितलं. पती घराबाहेर गेल्यानंतर पीडित महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्याशी लैंगिक अत्याचार केले. पीडितेचा पती काही वेळाने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार तिने सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी उमेश पांडेला अटक केली. पीडित महिला आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी

दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका नामांकित ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकाने 12 वीच्या विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने एकच संतापजनक घटना घडली.

इंटरनल मार्क देण्यावरून शिक्षकाने विद्यार्थिनीस ब्लॅकमेल केल्याने संतप्त पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या दालनासमोर काही वेळ ठिय्या आंदोलन केलं आणि नराधम शिक्षकाच्या अटकेची मागणी करत बेलापूर पोलिस चौकीसमोरही ठिय्या आंदोलन केलं.

या शिक्षकाने यापूर्वीही त्याने अशा पद्धतीचे निच कृत्य केल्याचा आरोप ग्रामस्थ आणि पालकांनी केला असून त्याला तात्काळ निलंबन करून त्याचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.

First published: January 22, 2020, 5:27 PM IST

ताज्या बातम्या