मराठी बातम्या /बातम्या /nashik /

हप्ता थकला; रक्षाबंधनावर सावट, लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकारांमुळे 18 हजार कुटुंबावर आर्थिक चणचण

हप्ता थकला; रक्षाबंधनावर सावट, लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकारांमुळे 18 हजार कुटुंबावर आर्थिक चणचण

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आली आहे.

वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अटकेचा फटका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे.

  • Published by:  Pooja Vichare
नाशिक, 21 ऑगस्ट: नाशिक (Nashik Crime News) जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अटकेचा फटका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे. 18 हजारांहून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहेत. झनकर यांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे दिल्या नसल्यानं वेतन रखडल्याची कोंडी निर्माण झाली आहे. 8 लाख रुपयांची लाच (8 Lakh Bribe) स्वीकारल्या प्रकरणी ही अटक (Woman education officer arrest ) करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना अटक केली. त्यानंतर पोलीस ठाणे किंवा न्यायालयात हजर न होता त्या फरार झाल्या होत्या. मात्र त्यांना नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतलं. न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्यानं झनकर यांचं उपसंचालक नितीन उपसानी यांनी निलंबन केलं. मात्र त्यानंतर प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं अपेक्षित होतं. ऑपरेशन Airlift: अफगाणिस्तानातील 85 भारतीय पोहोचणार मायदेशी  सध्या झनकर या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीनं कोठडीत आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टी आल्यानं त्यांना न्यायालयात हजर करता येऊ शकणार नाही. दुसरीकडे शिक्षण विभागाकडूनही काही पावलं अद्याप उचलण्यात आलेले नाहीत. त्यामुळे याचा फटका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, फरक देयके, वैद्यकीय देयके इत्यादी प्रश्न रखडलेत. शिक्षकांच्या रक्षाबंधनावर सावट या कारभारामुळे नाशिक जिल्ह्यातील 18 हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. या परिणाम शिक्षकांच्या हप्त्यावर बसला आहे. पगारातून चालू महिन्यात जाणारा हप्ता थकल्याचं शिक्षक सांगाहेत. Breaking News: तालिबानकडून 150 लोकांचं अपहरण, भारतीयांचा समावेश  रक्षाबंधनासह गणपती काही दिवसांवर आले आहेत. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात शिक्षकांना वेठीस धरलं जात असल्याची तक्रार नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे साहेबराव कुंटे यांनी केली आहे.
First published:

Tags: Crime news, Nashik

पुढील बातम्या